सिडको परिसरातील महाले फार्म परिसरातील रस्त्यांची डागडुजी.
- महाले फार्म परिसरातील रस्त्यांची डागडुजी
नवीन नाशिक प्रतिनिधी : महाले फार्म, महाराणा प्रताप चौक ते उदय कॉलनी, पवन नगर रस्ता हा खड्ड्यांमुळे अतिशय खराब झाला होता.
परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना यामुळे मोठ्याप्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबत हा रस्ता नवीन बनवावा किंवा किमान रस्त्याची डागडुजी तरी करावी अशी मागणी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सागर चौधरी यांनी नाशिक महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे तसेच सर्व वृत्तपत्राद्वारे केली होती अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. तसेच याबाबत नियमित पाठपुराव्यानंतर अखेर ह्या परिसरातील रस्त्यांची डागडुजी महानगरपालिकेकडून करण्यात आली.
पूर्वीचा प्रभाग क्रमांक २९ व सध्याचा प्रभाग क्रमांक ३७ मधील महाले फार्म महाराणा प्रताप चौक ते उदय कॉलनी पवन नगर हा रस्ता उपेंद्र नगर, त्रिमूर्ती चौक, सातपुर औद्योगिक वसाहत, त्रंबक रोड आदी परिसराला जोडला जाणारा नजीकचा रस्ता असल्याने याठिकाणी वाहतुकीची वर्दळ सतत सुरु असते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणच्या रस्त्याची दुरावस्था झालेली होती. रस्त्यात मोठमोठाले खड्डे असल्याने परिसरातील नागरिकांना इतरत्र जाण्यासाठी खुप ञास सहन करावा लागत होता. या रस्त्यातील खड्यांमुळे नोकरदार वर्ग तसेच विध्यार्थ्यांना देखील कसरत करत याठिकाणाहून मार्गक्रमण करावे लागत होते. खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांना आमंत्रण दिले जात होते.
परंतु आता ह्या रस्त्याची किमान डागडुजी तरी करण्यात आली म्हणून परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहे.
प्रतिक्रिया,
महाले फार्म येथुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यात खड्डे असल्याने खुप ञास सहन करावा लागत होता. याबाबत शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. महानगरपालिकेकडून संपूर्ण रस्ता हा नवीन बनवला पाहिजे, अशी आमची मागणी होती. परंतु किमान आता रस्त्याची डागडुजी तरी करण्यात आली, याबाबत देखील आम्ही समाधान व्यक्त करतो.