ब्रेकिंग

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १४ वर्षांखालील ) सी एन ए चा निर्णायक विजय तर केडन्स व ॲमबिशिअसला पहिल्या डावातील आघाडीचे गुण श्रावण देसाई ११६ धावा , शौर्य जाधव सामन्यात ८ व शौर्य देशमुख ७ बळी

 

 

 

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १४ वर्षांखालील )

 

सी एन ए चा निर्णायक विजय तर

केडन्स व ॲमबिशिअसला पहिल्या डावातील आघाडीचे गुण

 

श्रावण देसाई ११६ धावा , शौर्य जाधव सामन्यात ८ व शौर्य देशमुख ७ बळी

 

प्रतिक कडलगची अष्टपैलू चमक

 

 

नाशिक मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , सी एन ए ने निर्णायक विजय मिळवला तर केडन्स व ॲमबिशिअसला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.

 

महात्मानगर क्रिकेट मैदानावर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या केडन्सने पहिल्या डावात २९१ धावा केल्या.शनि निकम ने सर्वाधिक ८२ तर प्रतिक कडलगने ५० व अर्जुन सादलगेने ४९ धावा केल्या. नाशिकच्या प्रिन्स पटेलने ३ तर मंथन पिंगळे व आर्यन घोडके यांनी प्रत्येकी २ गडी बाद गडी केले .उत्तरदाखल नाशिकने पहिल्या डावात २२७ धावा केल्या . आर्यन घोडकेने सर्वाधिक ४५, रुद्र मेणेने ४१, वेदांत घोडकेने २८, नैतिक घाटेने २४ व श्रेयस हेकरेने २२ धावा केल्या. केडन्सनच्या प्रतिक कडलगने ३ गडी बाद करत केडन्सला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवून दिले.

 

दुसऱ्या सामन्यात एस एस के क्रिकेट मैदानावर सी एन एने उस्मानाबादवर १ डाव व ११८ धावांनी मोठा विजय मिळवला . सी एन ए चे श्रावण देसाई ११६ धावा व अर्णव मिरगे नाबाद ४९ यांनी फलंदाजीत तर गोलंदाजीत शौर्य जाधवने सामन्यात ८ बळी व कर्णधार शौर्य देशमुखने सामन्यात ७ बळी अशी प्रभावी कामगिरी करत मोठा विजय मिळवला .

 

 

तिसऱ्या सामन्यात एम सी सी क्रिकेट मैदानावर ॲमबिशिअसने सांगलीवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. ॲमबिशिअसतर्फे फलंदाजीत पार्थ दवे ५० धावा तर गोलंदाजीत अर्जुन साळुंके ५ बळी यांनी व सांगलीतर्फे फलंदाजीत शूभेंदू माजी ७९ व दीप जाधव ५९ धावा तर गोलंदाजीत निहाल मुल्ला सामन्यात ७ बळी यांनी चमक दाखवली.

 

महाराष्ट्रात नाशिक कोल्हापूर व पुणे येथे सदर राज्यस्तरीय साखळी स्पर्धा रंगत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे