अपघात टाळण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक – डॉ संदीप भानोसे

अपघात टाळण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक – डॉ संदीप भानोसे
जागतिक स्तरावर रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे . वय वर्ष 15 ते 25 या अवयव गटात सर्वात जास्त मृत्यू बघायला मिळतात . त्यासाठी या वर्गाला प्रबोधन करणे व वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणे अति आवश्यक बनलेले आहे असे प्रतिपादन वाहतूक सुरक्षा क्षेत्रात जागतिक विक्रम करणारे डॉक्टर संदीप भानोसे यांनी केले.
रोटरी इंटरनॅशनल व तोतले कॉमर्स अकॅडमी यांनी संयुक्त विद्यमाने युवा वर्गाकरिता वाहतूक व्यवस्थापनावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. रोटरी इंटरनॅशनल चे अध्यक्ष मंगेश अपशंकर यांनी बोधचिन्ह देऊन डॉक्टर भानोसे यांचा गौरव केला. निलेश सोनजे यांनी संदीप भानोसे यांचा परिचय करून दिला व सूत्रसंचालन केले . मंगेश अपशंकर यांनी रोटरीचे विविध उपक्रम यांची माहिती दिली. यश क्लासेस चे पवन जोशी यांनी डिजिटल खेळाबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर ऐश्वर्या कुलकर्णी यांनी दातांची घ्यावयाची काळजी वर प्रबोधन केले.
डॉ संदीप भानोसे यांनी रस्ते अपघात टाळण्याकरिता घ्यावयाची काळजी, हेल्मेटचे महत्त्व , चार चाकी चालवताना सीट बेल्ट चे महत्व विशद केले .
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान राबविले.