ब्रेकिंग

मुंबई विरुद्ध अंतिम सामन्यात  प्रतीक तिवारीचे महत्वाचे २ बळी साहिल पारखची चॅलेंजर ट्रॉफी साठी निवड

 

 

 

 

विनू मंकड स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजेतेपदात

 

 

मुंबई विरुद्ध अंतिम सामन्यात

प्रतीक तिवारीचे महत्वाचे २ बळी

साहिल पारखची चॅलेंजर ट्रॉफी साठी निवड

 

 

 

 

 

नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने बी सी सी आय च्या विनू मंकड करंडक स्पर्धेत मुंबई विरुद्ध अंतिम सामन्यात २ महत्वपूर्ण बळी मिळवत , स्वराज चव्हाण ५ बळी व शतकवीर अर्शिन कुलकर्णी यांचेसह महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवण्यास हातभार लावला. त्याबरोबरच आनंदाची बातमी म्हणजे नाशिकचा डावखुरा फटकेबाज सलामीवीर साहिल पारखची विनू मंकड करंडक स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.

 

 

 

होळकर स्टेडियम इंदोर येथे महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अर्शिन कुलकर्णीच्या १०५ धावांच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद ३१६ धावा केल्या, त्यास कर्णधार किरण चोरमलेच्या ७४, दिग्विजय पाटील ६० व सचिन धसच्या ५२ धावांची साथ मिळाली. उत्तरादाखल विजयासाठी ३१७ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाने मुंबईला २०१ धावांत रोखले. ते प्रामुख्याने स्वराज चव्हाणच्या ५ बळींच्या भेदक गोलंदाजीमुळे. त्यास नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारीने २ बळी मिळवत सुरेख साथ दिली. प्रतीकने सहाव्या क्रमांकावरील नूतनला १२ धावांवर व सर्वाधिक ६८ धावा करणाऱ्या पाचव्या क्रमांकावरील मनन भटचा महत्वपूर्ण बळी मिळवत महाराष्ट्र संघाला बलाढ्य मुंबई संघावर ११५ धावांनी विजयी करण्यात यश मिळवले. उपांत्यफेरीतही प्रतीकने उत्तर प्रदेशचा १ गडी बाद केला होता.

 

 

 

उप उपांत्य पूर्व फेरीपर्यंत नाशिकच्या सलामीवीर फलंदाज साहिल पारखसह प्रतीक तिवारीनेही अतिशय प्रभावी कामगिरी केली होती. बी सी सी आय च्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखने ९ डावांत २ शतके व एका अर्धशतकासह ३६६ धावा फटकावल्या. या जोरदार कामगिरीच्या जोरावरच साहिल पारखची चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.

 

प्रतीक तिवारीने ९ सामन्यात १६ गडी बाद केले. त्यात दिल्लीविरुद्ध एका डावात ४ बळी घेण्याची प्रभावी कामगिरी केली. तसेच डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेनेहि आपली चमक दाखवली.

 

 

 

बी सी सी आय च्या विनू मंकड करंडक स्पर्धेतील कामगिरीसाठी , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीक, साहिल व रोहनचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे व भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे