आरोग्य व शिक्षण

अल्पसंख्याक उमेदवारांकरिता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण*

 

*अल्पसंख्याक उमेदवारांकरिता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण*

*नाशिk जनमत.

शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत नाशिक विभागामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर ६८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. शासनातर्फे अल्पसंख्याक समुहातील युवक व महिला यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणास प्रवेश उपलब्ध आहेत. या अंतर्गत नाशिक विभागातील एकूण २७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे, असे सहसंचालक पी.एम. वाकडे यांनी कळविले आहे.

*विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था*

➡️नाशिक जिल्हा – नाशिक, नाशिक (मुलींची), दिंडोरी, चांदवड, कळवण, सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव

➡️धुळे जिल्हा – धुळे, शिंदखेडा

➡️नंदूरबार जिल्हा – नंदूरबार, नवापूर, अक्कलकुवा

➡️जळगाव जिल्हा – जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, पारोळा, पाचोरा, चोपडा

➡️अहमदरनगर जिल्हा अहमदनगर, संगमनेर, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर

अल्पसंख्याक समाजातील (मुस्लीम, जैन, ख्रिश्चन, नवबौद्ध, पारसी, शिख ) युवक व महिलांना हे प्रशिक्षण नि:शुल्क देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमानुसार ५ वी ते १२ वी पास अशी आहे. तरी गरजू उमेदवारांनी संबंधित प्राचार्यांशी प्रवेशासाठी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन श्री. वाकडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे