भुमी अभिलेख विभागाचा नादगाव येथील अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात.
भुमिअभिलेख विभागाचा नांदगाव येथील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
अरुण हिंगमीरे, जातेगाव, नांदगाव
आज नांदगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात लाचलुचपत विभाग धुळे यांच्या वतीने तक्रारदार पुरुष,वय-44 वर्ष यांच्या तक्रारीनुसार येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख वर्ग 2 विलास पांडुरंग दानी वय 49 यास चाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विलास दानी यांनी तक्रारदार व त्यांच्या भागीदार यांच्या मालकीच्या भूखंडाचे अति तातडीची बिनशेती मोजणी करून त्याचा नकाशा तयार करूण देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे रुपये 50 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी आज दिनांक 29 मार्च रोजी चाळीस हजार रुपयांचा पहिला हाप्ता स्वीकारताना विलास दानी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथील अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे विलास दानी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरील सापळा यशस्वी होण्यासाठी नाशिक परीक्षेत्रचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने सुनील कडासने आणि अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपाधिक्षक वाचक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे, सापळा अधिकारी, मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक, सहा. सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक म्हणून कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, महेश मोरे, संदिप कदम, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, चालक सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान भूमिअभिलेख मध्ये पडलेल्या जाळ्याने एकच खळबळ उडुन ज्यांची कामे सदर कार्यालयात अडकून पडली होती त्यांच्याकडून आणि तालुक्यातील जनतेकडून लाचलुचपत पथकाचे अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.