महाराष्ट्रराजकिय

माजी सैनिक व अवलंबितांच्या समस्या* *निराकरणासाठी 5 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे आयोजन* *- ओंकार कापले

*माजी सैनिक व अवलंबितांच्या समस्या*
*निराकरणासाठी 5 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे आयोजन*
*- ओंकार कापले*

*नाशिक, दिनांक: 28 जुलै, 2023नाशिक जनमत वृत्तसेवा):*
जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसिलदार व महसूल कर्मचारी यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट 2023 रोजी सर्व तालुक्यांमध्ये महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी दिली आहे.

या दिवशी आजी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांचे शेतीच्या रस्त्यासबंधी, घरकुल, निवृत्ती वेतन नसलेल्यांसाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजना, प्रलंबित फेर फार नोंदी, जमिनीचे वाटपपत्र, शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन इत्यादी महसूल संबंधी कामे करण्यासाठी तहसिलदार उपस्थित राहणार आहेत.

शासनाच्या वरील उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे