क्रिडा व मनोरंजन

जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता महिला मोर्चा नाशिक व जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत हेल्थ चेक अप कॅम्प व खेळ पैठणीचा .

नाशिक जनमत  जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता महिला मोर्चा नाशिक व जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत हेल्थ चेक अप कॅम्प व खेळ पैठणीचा तसेच लकी ड्रॉ, मी अ‍ॅण्ड मॅाम वॅाक स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाला महिला भगिनींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.पैठणीचा खेळ व यावेळी रांगोळी व वॅाक स्पर्धेतुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न महिला भगिनींनी केला. सर्व मातृ शक्तीचे सौ. कोमल वैभव महाले व सौ.जयश्री देवेंद्र चौधरी यांनी मनापासुन आभार मानले.या प्रसंगी नाशिक पश्चिम मतदार संघाच्या लाडक्या व लोकप्रिय आमदार सौ. सीमाताई महेश हिरे, भाजपा ज्येष्ठ नेते श्री बाळासाहेब पाटील, नविन नाशिक मंडलाध्यक्ष श्री. अविनाशजी पाटील, माजी नगरसेविका सौ.प्रतिभाताई पवार, सौ. भाग्यश्रीताई ढोमसे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश पदाधिकारी सौ. रोहिणी ताई नायडु, भाजपा महिला मोर्चा नाशिक महानगर सरचिटणीस सौ. रश्मीताई हिरे बेंडाळे,भाजपा नाशिक महानगर सरचिटणीस जगन आण्णा पाटील ,भाजयुमो नाशिक महानगर अध्यक्ष श्री. अमितजी घुगे, भाजपा शहर पदाधिकारी तथा मा. नगरसेवक अ‍ॅड .अजिंक्यजी साने, सातपुर भाजपा मंडलाध्यक्ष श्री. भगवानजी काकड,श्री. रुषिकेशजी आहेर, श्री.प्रशांतजी वाघ व महिला मोर्चा च्या सर्व सन्मानीय पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.यावेळी अत्यंत उत्साहात सर्व स्पर्धा व बक्षिस वितरण सोहळा पार पडला.मातृशक्ति चे अनोखे रुप यावेळी सादर करण्यात आले . यावेळी जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक टीम सौ. ललिता नवघिरे,प्राजक्ता देशपांडे, अश्विनी महाले ,पूजा चव्हाण, मंगला चौधरी,पुष्पा चौधरी,सोनिया पाटील, पल्लवी फगरे , कल्पना सोनार,कविता पाटील,तृप्ती धवन,योगिता बागूल,प्रिती भामरे,अक्षदा चौधरी, रुपाली वालझाडे ,पूनम बर्वे, शीतल महाले, नीलम कुमावत, स्नेहा नारकर यांचे विशेष सहकार्य लाभले व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विजयालक्ष्मी गुजर,व श्री. संतोष फासाटे यांनी केले. सौ. कोमल वैभव महाले व सौ.जयश्री देवेंद्र चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे