महाराष्ट्र

पारंपारिक शिवजयंती शिवाय अभ्यास पून शिवजयंती एकलहरा विद्यालयात साजरी.

नाशिक जनमत.  *पारंपारिक शिवजयंती शिवाय अभ्यास पून शिवजयंती एकलहरा विद्यालयात साजरी – माध्यमिक विद्या मंदिर एकलहरे शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा संस्थेचे संचालक सुरेशभाऊ घुगे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला . नेहमी प्रमाणे शिवजयंती विद्यालयात साजरी करतांना तोच तोच ईतिहास मुलांपुढे न सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य महाराजांचे गड किल्ले यांची माहिती चा पट गड किल्ले निमिर्ती अशा विविध अंगी ज्यातुन खरे छत्रपती मुलांच्या मनात निर्माण होतील अठरा पगड जातींना एकत्र करून राजा साठी स्वतः चा जिव ओवाळुन टाकणारी माणस तयार करणार हे नेतृत्व गुण असणारा एकमेव राजा . इतका मोठा राजा असतांना आपण काय फक्त अफजल खान वध , शाहिस्तेखान वध आग्रा वर सुटका इतकेच मुलांना शिकविणार का ? यापेक्षाही राजा किती मोठा होता हे आज मुलांच्या शिक्षकांच्या भाषणातुन व्यक्त झाले . मी पन्हाळगड बोलतोय मी शिवनेरी बोलतोय , मी राजगड मी पन्हाळा असे महाराजांचे दहा किल्ले आज एकलहरा शाळेत बोलले हे वेगळे पण जोपासण्याचे काम एकलहरा शाळेत झाले . जाती धर्मा पलीकडं राजे होते हे मुलांच्या मनात बिंबवल विचारांची शिवजयंती आम्ही साजरी केली . स्थापत्त कलेचा नमुना असणारे गड किल्ले मुलांनी बनविले , शिवाजी महाराजांच्या घोड्यांना सुद्धा प्रशिक्षण दिल जायच एक मावळा १०० शत्रुंचा खातमा कसा करीत होता गाणिमी कावा काय होता हे मुलांनी आज खऱ्या अर्थाने जानल शिवजयंती साजरी करावी तर अशी राजांचा जो ईतिहास मुलांना माहित होणे गरजेचे होते तेच एकलहरा शाळेने केले . संकल्पना एकलहरा शाळेचे प्राचार्य – साहेबराव कुटे याप्रसंगी सागर जाधव , जगताप साहेब , आसाराम शिंदे , उपप्राचार्य रजनी गिते प्राथमिक च्या बैरागी मॅडमसर्व कर्मचारी उपस्थित होते मनोहर दराडे सर यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगित सुंदर तयार करून त्याचे गायन झाले . डी एस सानप यांनी सुत्रसंचालन केले जाधव जी के यांनी आभार मानले .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे