आरोग्य व शिक्षण

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते होणार विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण*

 

*केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते होणार विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण*

*नाशिक, दिनांक: 10 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2023 रोजी विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम होणार आहे, असे कळवण उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिक हुसेन शेख व दिंडोरी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ.उज्वला तेजाळे यांनी कळविले आहे.

कळवण उपजिल्हा रूग्णालयातील नवजात शिशु देखभाल विभाग, इर्मजन्सी कोविड रिलिफ प्रोग्राम-II अंतर्गत कोविड फिल्ड हॉस्पिटल व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटचे भूमिपूजन तसेच दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या विस्तारित प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे