पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे* *14 फेब्रुवारी रोजी आयोजन* *: अनिसा तडवी*
*पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे*
*14 फेब्रुवारी रोजी आयोजन*
*: अनिसा तडवी*
*नाशिक, दिनांक 03 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे, असे जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्याचे आयोजन राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक, उदोजी मराठा बोर्डींग कॅम्पस, गंगापुर रोड येथे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत केले आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल्स येथे लावण्यात येणार असून कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर “पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फायर” या ऑप्शन वर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.