आरोग्य व शिक्षण

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ”महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन*

*लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ”महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन*

*नाशिक, दि. 29 जानेवारी, 2023 (विमाका वृत्तसेवा) :*

यंदाच्या वर्षी “ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा विषय चित्ररथाव्दारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला.यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.

चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ज्ञ समितीच्या अहवालावरुन मिळेल तर दूसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाईन मत (वोटिंग) नोंदविल्यानुसार मिळेल. त्यामुळे या लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :*
साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरुन खालीलप्रमाणे मेसेज मंगळवार दि.31.1.2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत पाठवावा.
MYGOVPOLL337011,12 हा SMS 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.
MYGOVPOLL (Space) 337011,12

किंवा
(आपणास खालील लिंकवर जावून “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल: https://www.mygov.in/group-pool/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )
आपण वरीलप्रमाणे Online voting करावे व त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group), फेसबुक (FB), व इतर समाज माध्यमांव्दारे हा संदेश पुढे पाठवावा आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विनंती करावी.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे