भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची मानवी साखळी करून लोकसत्ताक दिवस साजरा ; “भारतीय लोकसत्ताक दिन चिरायू होवो! प्रत्येक भारतीयांचा प्राण भारतीय संविधान” च्या जयघोषाने दुमदुमला परिसर.
*भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची मानवी साखळी करून लोकसत्ताक दिवस साजरा ; “भारतीय लोकसत्ताक दिन चिरायू होवो! प्रत्येक भारतीयांचा प्राण भारतीय संविधान” च्या जयघोषाने दुमदुमला परिसर.*
अंबाजोगाई (दि.26) प्रतिनिधी : अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर’ अर्थात आई सेंटर ने लोकसत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या शब्दांची माऊंट बोर्डवर पेंटिंग करून तयार केलेले फलक हातात घेऊन मानवी साखळी करत संविधानाच्या उद्देशिकेचे प्रात्यक्षिक सादरीकरण करत सामुहीक वाचन केले. यावेळी “भारतीय लोकसत्ताक दिन चिरायू होवो! प्रत्येक भारतीयांचा प्राण भारतीय संविधान” च्या जयघोषाने सर्व संघर्षभूमी, मेडिकल परिसर दुमदुमला होता. भारतीय संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही सर्वोच्च संविधानिक मूल्यांचा संदेश देते! त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही मोहीम केली गेली असल्याचे यावेळी आई सेंटर चे संचालक तथा ॲमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक, विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी सांगितले. यावेळी विचार मंचावर विशेष अतिथी म्हणून स्वा.रा. ती.ग्रा. शा. वै. म.रू. अंबेजोगाईचे अधीपरिचारिका श्रीमती आशा यादव, अधीसेविका श्रीमती यु.एस. भताने, पोलीस उप निरीक्षक विष्णू रोडे, कायदेतज्ज्ञ ऍड. संदीप थोरात, संचालक परमेश्वर जोंधळे, प्राचार्या के. उत्पल वर्णा,
शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. किर्तीराज लोणारे, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, पत्रकार जगणबापू सरवदे, दादासाहेब कसबे, दूरदर्शन चे रोहिदास हातागळे, प्रेरणादायी वक्ते सुशील भोसले, सजक पालक महादेव पुदाले व सामाजिक कार्यकर्ते नितीन सरवदे यांची उपस्थिती होती.
या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करणारे विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांचे समवेत आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आई सेंटर, इंग्लिश विंग्ज प्रि प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यावसायिक ई. अनेक क्षेत्रातील नामवंत लोक सहभागी झाले होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करून राष्ट्रीय एकात्मेचा संदेश देण्यात आला.
*या सृजनशील उपक्रमात ५ ते ८० वर्ष वयोगटातील ४५ जणांचा सक्रिय सहभाग*
विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे, डॉ. बबन मस्के, डॉ. किर्तीराज लोणारे, ऍड. संदीप थोरात, पीएसआय विष्णू रोडे, आशा यादव, यु.एस. भताने, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, परमेश्वर जोंधळे, के. उत्पल वर्णा, प्रा. डॉ. विनोद लांडगे, दादासाहेब कसबे, श्रेया पवार, यश जोंधळे, वैष्णवी पुदाले, प्रतीक गौतम, निकिता सोळंके, प्रगती गडदे, साक्षी खरटमोल, स्नेहल केदार, नितीन सरवदे, योगेश नन्नुरे, राधा गडदे, प्रियंका काळे, सुयोग केदार, सुनिल कांबळे, अंकिता पुदाले, शुभम मस्के, सुशील भोसले, विदिशा जोंधळे, संध्या गुट्टे, योगेश्वरी पुदाले, आरती वाघमारे, आर्यन मोरे, अमृता पुदाले, द्रोपदी आई सरवदे (80 वर्ष), ओम भोसले, नंदकिशोर गिराम, समीर चौधरी, अभय वाघमारे, राजेश डापकर, महादेव पुदाले, गणेश काळे, अभिषेक राऊत व गुलाबराव गायकवाड.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आई सेंटर’चे कपिल राठोड, अजय वेडे, संजय जाधव, यशदीप रोडे, व सर्व फॅमिली मेंबर्सनी परिश्रम घेतले.