सुखाचा मुख्य सिद्धांत आरोग्य आणि आरोग्याचा मुख्य सिद्धांत योग व संगीत*…
*सुखाचा मुख्य सिद्धांत आरोग्य आणि आरोग्याचा मुख्य सिद्धांत योग व संगीत*…
दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी बाॅईज टाऊन पब्लिक स्कूलचा माध्यमिक विभाग व मुझो फ्रिक संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे व रथसप्तमी म्हणजेच भारतीय संस्कृतीत सृष्टीचा जगत् चालक सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिवसाचे औचित्य साधून संगीत व सूर्यनमस्काराचे महत्त्व कळावे या उद्देशाने इयत्ता 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी समूह गायन व सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
‘ मुझो फ्रिक संगीत स्कूल’ चे संस्थापक श्री. अनिरुद्ध भूधर व त्यांच्या टीमने 800 विद्यार्थ्यांना प्रार्थना व देशभक्तीपर समूहगीत गायनासाठी मार्गदर्शन केले.
सकाळच्या कोवळ्या उन्हात
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन बाॅईज टाऊन शाळेच्या इतिहासात या सुवर्णमय क्षणांची नोंद केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ ह्यांनी स्वतः अतिशय उत्साहवर्धक, प्रेरणादायक सूत्रसंचालन करीत विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण केला . हा कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांच्या समन्वयाने उत्साहात संपन्न झाला.