ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी* *19 जानेवारीपर्यंत निवडणूकीचा खर्च सादर करावा*
उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे*
*ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी*
*19 जानेवारीपर्यंत निवडणूकीचा खर्च सादर करावा*
*: उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे*
*नाशिकजनमत. , दिनांक 16 जानेवारी (जिमाका* नाशिक जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी झाली असून या निवडणूकीचा निकाल 21 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी 19 जानेवारी 2023 पर्यंत निवडणूकीचा खर्च सादर करावा, असे उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन) नितीन गावंडे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,1958 चे कलम 14 (ब) अन्वये बिनविरोध व निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केलेल्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत म्हणजेच 19 जानेवारी 2023 पावेतो निवडणूकीचा खर्च सादर करणे बंधनकारक आहे.निर्धारित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब न सादर करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. बिनविरोध व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात विहित मुदतीत सादर करण्याची दक्षता घ्यावी, असेही उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन) नितीन गावंडे यांनी सांगितले आहे.