वडिलांनी केला आपल्या मुलीचा खून. अंबड परिसरातील रामकृष्ण नगर येथील घटना.

नाशिक जनमत. अंबड परिसरातील एक्सलो पॉईंट येथील रामकृष्ण नगर येथे आपल्या वडिलांनी राग अनावर झाल्याने आपल्या चोवीस वर्षे मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
राम कृष्ण नगर येथील राम किशोर भारती यांची चोवीस वर्षे कन्या ज्योती व वडील राम किशोर भारती यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असे यावेळी मुलगी होती ही वडिलांना न सांगता घराबाहेर जात असे याचा वडील राम किशोर भारतीयांना संताप होत असे. या संतापाच्या भरात मंगळवारी रात्री वडील राम किशोर भारती व 40 यांनी आपल्या मुलीचा राहत्या घरात गळा वळून खून केला या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस फाटा दाखल झाला असून उपयुक्त चंद्रकांत खांडवी. अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख उप निरीक्षक संदीप पवार उपनिरीक्षक किरण शेवाळे इत्यादी सह या घटनेचा तपास करत आहे. दरम्यान जन्मदात्या बापाने खून केल्याची घटना घडल्याने अंबड परिसर पुन्हा एकदा हदरला आहे.