- ब्रह्माकुमारी उज्वला दीदी यांचा प्रीती स्मृती मंचाच्यावतीने सत्कार
नाशिक – प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रीती स्मृती मंच या स्वयंसेवी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या इंदिरानगर सेवाकेंद्राच्या *”ब्रह्माकुमारी उज्वलादीदी* यांना अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल स्मृतीचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
उज्वला ताई या कै. सौ.मोरे मॅडमची माजी विद्यार्थिनी आणि देवळाली हायस्कूलच्या प्रथम गुणवंत विद्यार्थी आहेत.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जगन्नाथ दीक्षित,स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व अभियान’ प्रणेते,डॉ.अमोल कुलकर्णी मानसोपचार तज्ञ, गणेश गाढवे राज्य कर अधिकारी, जीएसटी विभाग, दत्तात्रय देवकर चेअरमन, पार्कसाईड होम्स असोसिएशन यावेळी कार्यक्रमाचेआयोजन प्रीती स्मृती मंचाचे अध्यक्ष संजय मोरे तसेच मंचाचे पदाधिकारी यांनी केले होते.यावेळी स्वर्गीय प्रीती मोरे यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पार्क साईड मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.
फोटो कॅप्शन —
प्रीती स्मृती मंचाच्या वतीने अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रह्माकुमारी उज्वला दीदी यांचा सत्कार करताना डॉ.जगन्नाथ दीक्षित समवेत संजय मोरे, दत्तात्रय देवकर,डॉ. अमोल कुलकर्णी