दिव्यांग स्वालंबन कार्ड वाटप कार्यक्रमात प्रहारच्या रुद्रावताराने आयुक्त आवक.
*दिव्यांग स्वावलंबन कार्ड वाटप कार्यक्रमात प्रहार च्या रुद्रावताराने आयुक्त अवाक*. . . . *नाशिक : नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागिय कार्यालय येथे सेवा-पंधरवडा निमित्ताने दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड व दिव्यांग प्रमाण पत्र वाटपाचे आयोजन मनपा आयुक्त मा.फुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले, ब-याच वेळापासुन जमलेले दिव्यांग आयुक्त महोदयांच्या प्रतिक्षेत होते कार्यक्रमस्थळी आयुक्तांचे आगमन होताच सुत्रसंचालनाकडुन आयुक्त थोडाच वेळ देणार
असल्याचे सांगितले, निमंत्रक म्हणून उपस्थित असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके यांनी भर कार्यक्रमात उभे राहून आयुक्तांकडे जर वेळच नसेल तर कशासाठी दिव्यांगांना ताटकळत ठेवले, नाशिक शहरात दहा हजारांच्यावर दिव्यांग असुन जर दिव्यांगांसाठी आयुक्त जर पाचच मिनिटे वेळ देत असतील व दिव्यांगांचे तक्रारी ऐकत नसतील तर ही दिव्यांगांसाठी शोकांतिका असल्याचे बोडके यांनी सांगितले, आयुक्तांनी तत्काळ बोडके यांना बोलण्यास व दिव्यांग समस्या -व्यथा -प्रश्न मांडण्यास सांगितले, दिव्यांगांसाठी होत असलेले इटीसी सेंटर रद्द करुन १७ कोटी दिव्यांगांसाठी व्यक्तीगत खर्च करणे, फिरता दवाखाना सुरु करणे, दिव्यांग भवन ऊभारणे, दिव्यांगाना हाँकर्स झोन मध्ये जागा आणि स्टाँल ऊपलब्ध करून देणे, दरवर्षी राखिव दिव्यांग निधी विहीत मुदतीत खर्च करणे, योजना क्रमांक 1ते 9 साठी अर्ज केलेल्या दिव्यांग लाभार्थी यांची प्रकरणे तातडीने निकाली काढणे, आदी मागण्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले, तत्काळ दिव्यांग समस्या मार्गी लावण्यात येतील, कोणत्याही दिव्यांगांस योजना संबधी तक्रार असल्यास मला व्यक्तीगत भेटावे असे आवाहन ही मा.आयुक्तांनी केल्याने दिव्यांगांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पंचवटी विभागिय कार्यालया चे विभागीय अधिकारी मा.श्री. कैलास राबडीया यांनी मा.आयुक्त पुलकुंडवार यांचा सत्कार केला, या वेळी मा.आयुक्तांचे हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके ,जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, समाधान बागल, शाम गोसावी, प्रमोद केदारे,बाजीराव गुळवे, सुभाष जगताप यांचा सत्कार करण्यात आला, अधीक्षक मंगेश वाघ, सहाय्यक अधीक्षक भुषण देशमुख, कनिष्ठ लीपीक सीमा गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतल्याने त्यांचा विभागीय अधिकारी कैलास राबडीया यांचे हस्ते सत्कार करण्यात आला,* *सुञसचांलन सुनिता पाटील यांनी केले* *या कार्यक्रमास सपांदक मा.किशोर बेलसरे , तसेच पञकार बांधव आणि पचंवटीतील बहुसंख्य दिव्यांग बांधव आणि दिव्यांगाचे पालक ऊपस्थित होते*