दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. योगेश पाटील.
*दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत*
*: योगेश पाटील*
*नाशिक: दिनांक 22 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगज सशक्तीकरण विभागाने राष्ट्रीय पुरस्कार 2021 व 22 करीता दिव्यांग व्यक्ती व संस्थाकडून अर्ज मागविले आहेत. या पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी 28 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, राष्ट्रीय पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज www.awards/gov.in या संकेतस्थळावर 28 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावयाचे आहेत. अर्ज करतांना 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षाकरिता गृहमंत्रालयाने तयार केलेल्या संकेतस्थळावर पासवर्ड संरक्षित करून स्वतंत्ररित्या अर्ज सादर करावेत. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात उपलब्ध असलेल्या अर्जातील सर्व मुद्यांची माहिती तसेच उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असेही जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार व अर्ज सादर करण्याबाबत अधिक माहिती www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगा व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या मार्गदर्शक सुचनांनूसार अर्ज विचारात घेण्यात येतील. त्याकरीता दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी संकेतस्थळावर अर्ज भरतांना 1 ते 4 बाबींची पुर्तता करून अर्ज व नामांकन करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले आहे.Σ
0000000000