फिट इंडिया मिशन अंतर्गत एकदिवसीय मोफत आरोग्य शिबिर संपन्न.
*फिट इंडिया मिशन अंतर्गत एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिर संपन्न*
नासिक-भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मै फिट तो इंडिया फिट या अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचा अविभाज्य भाग म्हणून नवजीवन वेलनेस परिवार व प्रियंका फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील लक्ष्मी लॉन्स येथे एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
निरोगी आणि समृद्ध जीवन हा दैनंदिन कार्यातील अविभाज्य भाग आहे आणि फिट इंडिया अभियान हे निरोगी आणि समृद्ध भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे आपले आयुर्मान व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे व योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे असे आवाहन वरिष्ठ आरोग्य सल्लागार श्री. किरण कानडे सर यांनी याप्रसंगी केले.
समाजातील प्रत्येक घटक हा तंदुरुस्त राहिला पाहिजे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार समाजामध्ये वाढते वजन व चुकीची जीवनशैली यामुळे वाढत असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे आणि हा धोका टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे अशी माहिती दिली. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तरी अधिक क्षमतेने काम करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे आणि हे सर्व नियमित व्यायाम व सकस आहार याद्वारे साध्य होऊ शकते असे प्रतिपादन वरिष्ठ आरोग्य सल्लागार श्री दीपक भुते यांनी केले.
समाजातील प्रत्येक घटक हा तंदुरुस्त राहिला पाहिजे आणि स्वतः निरोगी व तंदुरुस्त राहून आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक बबन नागरे व गजानन वाघ यांनी दिली.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार समाजामध्ये वाढते वजन व चुकीची जीवनशैली यामुळे वाढत असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे आणि हा धोका टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे अशी माहिती प्रियंका फिटनेस सेंटर आरोग्य सल्लागार प्रियंका वाघ यांनी दिली दिली.
या कार्यक्रमांमध्ये विविध आरोग्य प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी नवजीवन वेलनेस परिवार व प्रियंका फिटनेस सेंटर यांच्यावतीने एका महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी करणाऱ्यास एक ग्राम सोने आणि महिनाभर सलग जोडीने ऑनलाईन व्यायाम करणाऱ्या चांदीची अंगठी भेट देण्यात आली व सर्व सहभागी आरोग्य मार्गदर्शक यांचा सत्कार सन्मान करण्यात आला .
या शिबिराची सुरुवात सकाळी पाच वाजता ऑनलाइन ग्रुप वर्कआउट द्वारे करण्यात आली यामध्ये नासिक मुंबई बुलढाणा धुळे येथील आरोग्य मार्गदर्शक उपस्थित होते. पहाटे संगीतमय वातावरणामध्ये पाच ते सात या वेळेस वरिष्ठ आरोग्य सल्लागार श्री दीपक भुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यायाम प्रकार घेण्यात आले यामध्ये सर्व आरोग्य सल्लागार व नागरिक उपस्थित होते या शिबिरासाठी ऑनलाइन द्वारे महाराष्ट्रातील विविध भागातील आरोग्य प्रेमी गुगल मी द्वारे व्यायाम प्रकारांमध्ये सहभागी झाले होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुमावत सर व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन बबन नागरे यांनी केले.
- सदर कार्यक्रमासाठी ज्योती भुते मॅडम, प्रियंका कुमावत ,नंदिता मोरे ,वर्षा मोरे ,मधुकर चव्हाण, अर्चना नागरे ,सीमा पाठक ,कृष्णा पाठक धनश्री बोस, शशिकला थोरात ,अमृता वडजे व रूपाली थोरात आधीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते