आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
स्वामींच्या दुरदृष्टीमुळे आज स्री पुरुष समानता. डॉक्टर पवार

*स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच आज स्त्री – पुरुष समानता: डॉ. पवार*
डॉ . भारती पवार यांनी सांगितले की महानुभाव पंथाबद्दल सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा, परिसंवाद घडावेत, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे महानुभाव तत्त्वज्ञान विश्वातील सर्व भाषेत पोहोचले पाहिजे. संकुचितपणा सोडून आपल्या संंस्कृती वृध्दीसाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ. भारती पवार यांनी केले.
- श्री चक्रधर स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच आज स्त्री – पुरुष समानतेचे युग दिसते, महिलांना आज सर्व क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळते आहे, कारण स्वामींनी त्या काळात समतेची युग निर्माण केले होते. श्री चक्रधरस्वामींनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांना दर्शनाचा, भक्तीचा अधिकार मिळाला पाहिजे. हा विचार स्वामींची दुरदृष्टी दर्शवितो. कारण, याच विचारांचा परिणाम म्हणजे आज अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याला संपूर्ण देशभरातून येथे उपस्थित झालेल्या नारीशक्तीचे दर्शन आपल्याला घडत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथे केले.