ब्रेकिंग

फटाक्यांची आतषबाजी करत मंत्री छगन भुजबळ यांचे नगरसुल मध्ये जल्लोषात स्वागत* *फक्त मांजरपाडा प्रकल्पावर आपण थांबणार नाही – मंत्री छगन भुजबळ*

*फटाक्यांची आतषबाजी करत मंत्री छगन भुजबळ यांचे नगरसुल मध्ये जल्लोषात स्वागत*

 

*फक्त मांजरपाडा प्रकल्पावर आपण थांबणार नाही – मंत्री छगन भुजबळ*

 

*पार गोदावरी प्रकल्पातून ७ टीएमसीहून अधिक पाणी उपलब्ध करू*

 

नाशिक जनमत.   *येवला,नगरसूल,दि.३ नोव्हेंबर:-* मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून येवल्याला पाणी आपण पोचवले आहे. आपण केवळ आपण यावर थांबणार नाही तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून ७ टीएमसी हून अधिक पाणी आपण येवल्यासोबतच मराठवाड्यापर्यंत नेऊ असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी

 

 

कॉंग्रेस,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज येवला तालुक्यातील नगरसूल येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेच्या प्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी प्रचार प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर,जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, नगरसुल च्या सरपंच मंदाकिनी पाटील,ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, अरुणमामा थोरात, विश्वास बापू आहेर, एल.जी.कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, साहेबराव मढवई, आरपीआयचे संजय पगारे, शिवसेना शिंदे गटाचे किशोर सोनवणे,भाजपचे प्रमोद सस्कर, विनायक भोरकडे, नानासाहेब लहरे, राजाभाऊ लोणारी, बंडू क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी, सुनील पैठणकर, राजाभाऊ परदेशी,प्रशांत पानपाटील, सचिन कळमकर,बाळासाहेब कुऱ्हे, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, डॉ.प्रवीण बुल्हे, गणपत कांदळकर, डॉ.कमलेश पैठणकर,ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

यावेळी मंत्री छगन म्हणाले की, ज्यांनी मला विकासासाठी येवल्यात आणले. निवडून आल्यावर सर्व कारभार त्यांच्याच हातात होता. विकासाची कामे सुरु झाली होती. तरी देखील लगेचच पाच वर्षांनंतर लगेचच माझ्या विरोधात निवडणूक लढविली. या मागे त्याची भूमिका नेमकी काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासाला कुठलीही मर्यादा नसते त्यामुळे यावर विश्वास ठेऊन येवलेकरांनी मला पुन्हा एकदा निवडून दिले. त्यानंतर मतदारसंघात विकासाची अनेक कामे आपण करू शकलो असे त्यांनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले की, मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे आपण मार्गी लावली. आता येवला ते पिंपळस तसेच लासलगाव विंचूर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन गती मिळणार आहे.कोरोनाच्या काळात मतदारसंघा बरोबरच जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करून देण्यात आली.येवल्यात सुमारे १७ एकर जागेवर भव्य प्रशासकीय संकुल उभे केले.पवार साहेबांनी या मॉडेलचे उद्घाटन केले.या कामाचे त्यांनी कौतुक करत देशभरात हे मॉडेल राबविण्याबाबत संकल्पना मांडली. येवल्यात पैठणी व्यवसायाला चालना देण्यासाठी पैठणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले. पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे 2004 मध्ये चार दुकाने असलेल्य येवल्यात आज पैठणीचे ५०० हून अधिक दुकाने आहे. जगभरातून लोक आज येवल्यात खरेदीसाठी येतात. त्यामुळे येवल्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. येवल्याच्या मुक्तीभूमिचा विकास, शिवसृष्टी, नाट्यगृहाची निर्मिती, अहिल्याबाई होळकर घाटाची निर्मिती अशी अनेक कामे केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी प्रचार प्रमुख अंबादास बनकर म्हणाले की, सतत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ काम करत आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजानांची अमलबजावणी करून मतदारसंघातील शेतकरी सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न आहे. आज शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय असेल, तसेच त्यांच्यासाठी विविध योजना ज्या आणल्या जात आहे त्या योजनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मांजरपाडा सारखा प्रकल्प साकार करून त्यांना बागायतदार करण्याचे काम त्यांनी केल आहे. शेतकऱ्यांच्या कैवारी असलेल्या या नेत्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्यांना भरभरून मतदान देऊन पहिल्या नंबर ने मंत्री छगन भुजबळ यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार म्हणाले की, येवला तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी १४६ कोटी रुपये नुकसान भरपाई मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मिळवून दिले. हे केवळ भुजबळ साहेबांमुळे शक्य झाले आहे. पिकाच्या उत्पन्नातून जेवढे उत्पन्न मिळाले नाही. तेवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मंत्री छगन भुजबळ यांच्या कामाचे कौतुक देशभरात होते. त्यामुळे येवल्याच्या विकासासाठी त्यांना आपल्याला पाचव्यांदा विधिमंडळात पाठवायचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.

 

दरम्यान इंडियन आयडल फेम येवला तालुक्यातील सुप्रसिद्ध गायिका आम्रपाली पगारे कडून मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. या गाण्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी तिचे कौतुक केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे