फेजपुर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन ध्वजारोहण करुन करण्यात आला साजरा.
प्रतिनिधी हिरालाल लोधे.
*फैजपूर येथे महाराष्र्ट दिन व कामगार दिन ध्वजारोहण करुन करण्यात आला साजरा*
फैजपूर प्रांत कार्यालयात १मे महाराष्र्ट दिन व कामगार दिनानिमीत्त प्रांताधिकारी श्री. कैलास कडलग यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच फैजपूर नगरपरिषद येथे आमंत्रीत विशेष मुख्य अतिथी म्हणून देखिल त्यांचे हस्ते भारतमातेचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस प्रशासनाने तसेच ऊपस्थितांनी मानवंदना देवून राष्र्टगीत गायन केले. महाराष्र्टातील नागरिकांनी कोणाच्याही बहकाव्यात न येता राज्यातील जातीय सलोखा, कायदा-सुव्यवस्था, शांतता, प्रगती टिकून राहण्यासाठी महाराष्र्टातील नागरिकांनी व कामगारांनी सतत प्रयत्नशील असायलाच पाहीजे असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.
१मे महाराष्र्ट दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी प्रांताधिकारी श्री. कैलास कडलग, फैजपूर न.पा. मुख्याधिकारी वैभव लोंढे,सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगांवकर, भारतीय मिडिया फाऊंडेशन महाराष्र्ट राज्य चेअरमन हिरालाल लोथे,ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण होले, पत्रकार नंदू अग्रवाल, योगेश सोनवणे, ऊमाकांत पाटील,बापूदादा वाघुळदे,केतन किरंगे, हेमराज चौधरी, पंडीत कोल्हे, विवीध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची अनेक नागरिकांसह विविध क्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रतिष्ठीत मान्यवरांसह ऊपस्थिती होती.