बाईज टाऊन शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.
- बॉईज टाऊन शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
दि. 1 मे 2022 रोजी बॉईज टाऊन शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती वागळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रीजा राजू, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यपिका डॉ. स्वामिनी वाघ तसेच उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. मनिषा पवार उपस्थित होते. शाळेचे पर्यवेक्षक श्री. पी. डी. मुसळे, पर्यवेक्षिका श्रीमती पद्मश्री संवत्सरे व श्रीमती नीता ठक्कर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. श्रीमती स्नेहल सालोडकर यांनी स्वागतगीताच्या शब्दसुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर कामगार दिन या विषयावर श्री. रानडे व महाराष्ट्र दिन या विषयावर श्री. खताळे व श्री. दरेकर या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. ईश्वर काळे सर व सहकारी शिक्षकांनी समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ईश्वर काळे व श्रीमती कल्याणी सूर्यवंशी यांनी केले. श्रीमती कल्याणी सूर्यवंशी यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.