ब्रेकिंग

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या ऐतिहासिक पर्वातील ‘ध्वजारोहण सोहळ्याच्या’ नियोजनासाठी कुंभमंत्री व पालकमंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली NTKMA कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

नाशिक जनमत   -त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या ऐतिहासिक पर्वातील ‘ध्वजारोहण सोहळ्याच्या’ नियोजनासाठी आज कुंभमंत्री व पालकमंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली NTKMA कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य ध्वजारोहण सोहळ्याला आदरणीय राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ५०१ शंखांचा विश्वविक्रमी शंखनाद, ६,५०० भाविकांची सामूहिक आरती आणि विशेष कुंभगीताचे लोकार्पण अशा दिव्य-भव्य धार्मिक उपक्रमांची आखणी या बैठकीत करण्यात आली.

 

भाविकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि वारसा परंपरांचा आदर राखत हा सिंहस्थ कुंभमेळा जगभरातील भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यासाठी नाशिक महानगरपालिका व सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहेत!

या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे,, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिलीप बनकर, राहुल ढिकले, गोकुळ गिते, सरोज आहिरे, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह कुंभ आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संजय येनपुरे, विवेक सोनुने, लीना बनसोड यांच्यासह संबंधित अधिकारी, सर्व 13 आखाड्यांचे प्रतिनिधी, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि साधू-महंत उपस्थित होते.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे