गौरीच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण.

गाराईच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण.
, नाशिक जनमत सध्या गणपती उत्सव चालू आहेत. चौथ्या दिवशी गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरींचे आगमन होते आणि बाप्पांच्या आगमनाच्या आनंदामध्ये अजूनही भर पडते. यावर्षी देखील सोनपावलांनी गौरीचे आगमन झालेले आहे.
१७) विघ्नहर्त्या गणरायापाठोपाठ अनेक घरांत गुरुवारी (दि. ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी उत्साहात आगमन झाले. तीन दिवसांसाठी माहेरवाशिणी म्हणून दाखल झालेल्या गौराईंमुळे चैतन्य पसरले असून, आज (दि. १८) पूजन, भोजन होणार आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद शुक्ल
पक्षात अनुराधा नक्षत्रावर त्यांचे आगमन होते. त्यांना महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. पहिल्या दिवशी आवाहन, दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन-भोजन होते, तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर निरोप दिला जातो. त्यानुसार गुरुवारी घरोघरी
गौरींच्या तांब्याच्या, चांदीच्या वा मातीच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेकांनी गौराईंची छोटेखानी मिरवणूक काढली. दुपारी त्यांचे आवाहन करण्यात आले. शुक्रवारी (दि. १८) रात्री १०.४५ पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र असल्याने रात्री उशिरापर्यंत पूजन केले जाऊ शकणार आहे. दरम्यान, गौरींच्या नैवेद्यासाठी भाज्या, फळांच्या खरेदीसाठी बाजारात वर्दळ दिसून येत होती. गौराईंचे शनिवारी (दि. १९) विसर्जन होणार आहे.



