आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज लक्ष्मी विजय लॉन्स येथे साधूग्राममधील सर्व शेतकरी बांधवांसोबत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार .

नाशिक जनमत आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज लक्ष्मी विजय लॉन्स येथे साधूग्राममधील सर्व शेतकरी बांधवांसोबत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गेल्या १० दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सोबत जी बैठक शेतकऱ्यांची झाली होती त्यात ज्या जास्तीच्या जागा होत्या त्यात महानगरपालिकेसोबत जमिनीचा भाडेतत्वावर MOU केला जाणार असून शेतकऱ्यांच्या जमिनींवर भविष्यात कोणतेही निर्बंध असणार नाहीत याची पूर्ण शाश्वती यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

तसेच २००३ आणि २०१५ मधील प्रलंबित भूसंपादन व मोबदल्याच्या प्रश्नांवर यावेळच्या बजेटमध्ये भूसंपादनासाठी विशेष निधी राखून ठेवून कोर्टाच्या आदेशानुसार योग्य पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांनावर सकारात्मक संवाद देखील झाला होता. त्यात शेतकऱ्यांचे जे स्थानिक प्रलंबित प्रश्न होते त्यावर समाधानकारक चर्चा झाली होती.

स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यात ५०० मीटर रस्ता, १ किमी पार्किंग आणि कॅनॉल रोड ते जत्रा रस्ता यांसारख्या सर्व स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्यात आले असून मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि कुंभमंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन हे शेतकऱ्यांच्या बाजूने अतिशय सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. सर्वांच्या समन्वयातून हा कुंभमेळा अत्यंत लोकाभिमुख आणि यशस्वी रीतीने पार पाडण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.

यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक संचालक नगरनियोजन मनपा दिव्यांक सोनवणे, नगरसेवक रिद्धीश निमसे, मा. नगरसेवक उद्धव बाबा निमसे, ॲड. रवींद्र निमसे, संदीप निमसे,नितीन निमसे, हरीशचंद्र निमसे, श्याम कोठे, श्याम अनवट, सोमनाथ हामरे, शिवाजी माळोदे, राजाराम निमसे, दिलीप निमसे, आदींसह अधिकारी व स्थानिक शेतकरी उपस्थित होते



