ठक्कर बाजार बस स्थानकात प्रवासी असुरक्षित अपघात सतरा वर्षीय युवतीचा मृत्यू.
बस स्थानक चोरीच्या घटनांमध्ये वाढ. खिसे कापू चेन स्कॅनिंग. त्या घटना नेहमीच्या.

नाशिक जनमत पळसे येथील सतरा वर्षीय आकांक्षा शेलार तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण पळसे परिसर शोकाकुल झालेला आहे. त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या आकांक्षा हिचा नाशिकच्या ठक्कर बस स्टॅन्ड मध्ये एसटीच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे एसटी कारभाराचा अजब गजब कारभार पुन्हा एकदा दिसून आला. बस चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे नाशिक शहरातील कुंभमेळ्याच्या धरतीवर सर्वच बस स्टॅन्ड वरील वरील प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस स्टॉप वाढवणे

महत्त्वाचे झाले आहे. सतरा वर्षीय युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान बस स्थानकातही प्रवासी सुरक्षित नसल्याचे दिसून आलेले आहे यापूर्वी असे अपघात झालेले आहेत

यापूर्वीचे अपघात…
७ डिसेंबर २०२४: महामार्ग
बसस्थानक, मुंबई नाका शिर्डीवरून नाशिकमध्ये आलेली एमएच ०४ एलक्यू ९४६२ क्रमांकाची ई-बस बसस्थानकात चौकशी कक्षासमोर थांबली होती. बसचालक उमेश दत्तात्रय भाबड (वय ३२, रा. वेहळगाव, नांदगाव) काम झाल्यानंतर पुन्हा बसमध्ये बसले. त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला आणि बस अचानक पुढील बाजूने वेगाने सरकली. त्यात फलाटावरील लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन धडकली. या घटनेत दोन जण जखमी, तर एका महिलेचा
मृत्यू झाला होता.
ऑक्टोबर २०२४ : जुने सीबीएस फलाटावर उभ्या :
भरधाव एसटी बसने थेट प्रवाशांनाच उडवले. या भीषण धडकेत आकांक्षा रामभाऊ शेलार (वय १७, रा. पळसे)
असलेल्या प्रवाशाला मागे येणाऱ्या बसने धडक दिल्याने अशोक शांताराम पवार (वय ५४, रा. पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
नोव्हेंबर २०२३ : महामार्ग : बसस्थानक बसस्थानकातून एसटी बाहेर पडत असताना घाईत चढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन बसच्या चाकाखाली आल्याने संगीता रमेश सोनवणे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या होत्या.
मार्च २०२३ : ठक्कर बाजार स्थानकात बस मागे घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दगडू त्र्यंबक पाटील (वय ६२) यांना गंभीर दुखापत झाली होती.
या युवतीचा मृत्यू झाला, तर तिची आई सुदैवाने थोडक्यात वाचली. या प्रकरणी करण उत्तम वारुंगसे (वय
२१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच ४० वाय ५६६२ क्रमांकाच्या बसचालक भिका एकनाथ आहिरे (वय ४५) याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १०६ (१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद आहे.
रुग्णालयात नातलगांचा आक्रोश
फिर्यादी करण वारूंगसे यांची आई व मानलेली मावशी यांच्यासह त्यांच्या दोन मुली त्र्यंबकेश्वर येथे फेरी व दर्शनासाठी निघाले होते. बस येण्यापूर्वी ते फलाटावर उभे असताना स्थानकात बस अतिशय वेगाने आली. त्यावेळी बसचा धक्का लागल्याने आकांक्षासह तिची आई खाली पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आकांक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत करणसह तिच्या नातलगांना रिक्षेतून तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून आकांक्षाला मृत घोषित केल्यानंतर नातलगांनी आक्रोश केला.
आकांक्षाच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे. ती नाशिकरोडच्या एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. चौधरी बिल्डर्स पळसे परिसरात आकाशाचा परिवार राहत होता. परिसरातील वातावरण आकाशांच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला आहे.



