भाडेकरूंची माहिती देणे अनिवार्य शहरात ४ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी
र
भाडेकरूंची माहिती देणे अनिवार्य
शहरात ४ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी
, नाशिक जनमत शहराची सुरक्षता आभारीत राहवी म्हणून नाशिक शहरात भाडे करारावर राहणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे महत्त्वाचे झाले आहे. शहारांत वाढलेली गुन्हेगारी घरपोळ्या चोऱ्या सायबर क्राईम यावर अंकुश ठेवण्यासाठी ही माहिती देणे जरुरी झाली आहे
शहर परिसरातील घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (१) व (३) अन्वये शहर
कार्यक्षेत्रात ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार मंदिर, गुरुद्वारा, चर्च, मशीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉज आदींचे विश्वस्त, संचालक मंडळ, चालक-मालक, तसेच घरमालकांनी त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास द्यावी. भाडेकरूंच्या ओळखीबाबत त्यांच्या मूळ वास्तव्याचा पुरावा किंवा ओळखपत्राचा पुरावा, नजीकच्या काळातील छायाचित्र, भाडेकरारनाम्याची छायांकित प्रत आदी माहिती www.nashikpolice.gov.in या संकेतस्थळावरदेखील देता येईल.
..यांनीही माहिती देणे अपेक्षित
वाहन बाजारातील व्यावसायिकांनी द्यावी वाहन खरेदी-विक्री केलेल्यांच्या नावांची यादी व पत्ते
फेरीवाले, भंगार साहित्य खरेदी किंवा विक्री करणाऱ्यांनी द्यावी व्यवहाराबाबतची माहिती
मोबाइल सिमकार्ड विक्रेत्यांनी द्यावे कार्ड खरेदी करणाऱ्यांचे नाव, पत्ता व आधारची माहिती
सायबर कॅफेचालकांनी द्यावे ग्राहकांचे नाव, पत्ता व आधार कार्डची माहिती


