ब्रेकिंग

नाशिक महानगरपालिकेत ‘NAMASTE Day’ उत्साहात संपन्न

नाशिक महानगरपालिकेत ‘NAMASTE Day’ उत्साहात संपन्न

 

नाशिक, दि. १४ जुलै : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय (MoHUA) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) अभियानांतर्गत ‘NAMASTE Day’ निमित्त नाशिक महानगरपालिकेमार्फत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

महापौर सौ. हिमगौरी आडके तसेच आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी NAMASTE अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शुभेच्छा देत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता, सन्मान व कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत संदेश दिला. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सुरक्षित, यांत्रिकीकरणावर आधारित व सन्मानजनक करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

 

कार्यक्रमास उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती श्री. मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त श्री. अमित रंजन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पालोड, अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र धारणकर, श्री. गणेश मैड, श्री. राजेंद्र शिंदे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. दीपक नाखवा, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, QCI (Quality Council of India) संस्थेचे प्रतिनिधी तसेच महापालिकेचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी शहरातील NAMASTE योजनेअंतर्गत नोंदणीकृत कचरा वेचक (Waste Pickers) तसेच SSW (Sewer Sanitation Workers) यांना प्रातिनिधिक स्वरूपात वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE) किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच NAMASTE योजनेअंतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षण पूर्णत्व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

 

याशिवाय, NSDC (National Skill Development Corporation), QCI (Quality Council of India) आणि EPIC Foundation यांच्या माध्यमातून आयोजित ‘सफाई मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षण पूर्णत्व प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठीचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, सन्मान आणि आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून NAMASTE अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे, यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करणे तसेच स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा केली. यावेळी NAMASTE अभियानाची उद्दिष्टे, कचरा वेचक घटकांचा सन्मान, क्षमता विकास प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे, वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE) वितरण, सामाजिक समावेश तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता व सन्मान या बाबींचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या ‘१४४२०’ सेप्टिक टँक व भुयारी गटार तक्रार निवारण हेल्पलाईन तसेच ०२५३-२५७१८७२ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी सेप्टिक टँक व भुयारी गटारासंदर्भातील तक्रारी नोंदविण्याचे तसेच स्वच्छ, सुरक्षित आणि यांत्रिकीकरणावर आधारित स्वच्छता व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे