ब्रेकिंग

भावली धरण परिसरात पर्यटकांना मारणारे नऊ गावगुंड जेरबंद

२० किमा पाठलाग, महिलचा विनयमग; पर्यटकांना मारणारे नऊ गावगुंड जेरबंद

 

|

नाशिक जनमत

दोन दिवसा पूर्वी भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकच्या कुटुंबाच्या कारचा २० किमीपर्यंत दुसरी कार आणि दुचाकीने पाठलाग करत पर्यटकांच्या कारच्या काचा फोडून, जीवे मारण्याचा प्रयत्न, लूट आणि महिलेचा विनयभंग करणाऱ्या ९ गावगुंडांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. भिवंडी, वाडा येथील लॉजमध्ये बनावट नावाने ते लपून बसले असताना पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील ३ संशयित

 

 

अजूनही फरार आहेत. विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेढे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ

गिते विनोट लक्ष्मण बोराडे सचिन

दत्तू आडोळे, देविदास कचरु भगत, अजय भूषण दालभगत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे

संशयित गिरणारे, इगतपुरी, माणिकखांब, घोटी येथील राहणारे आहेत. अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईबाबत माहिती दिली.

मोक्कान्वये कारवाई

टोळीचे कृत्य गंभीर आहे. एका संशयितावर आधीच खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया केलेले असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी सांगितले या घटनेने धरण परिसरात जाणाऱ्या पर्यटकांमध्ये घबराट पसरले आहेत.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे