ब्रेकिंग

नाशिक शहरात मुसळधार पाऊस. महानगरपालिका शाळेला सुट्टी.

 

 

नाशिक जन्मत नाशिक जिल्ह्यात आज दिनांक ०८ जूलै, २०२६ मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

नाशिक शहर व परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे मुसळधार पाऊस सुरु रहाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी शक्यतो घरूनच काम करावे (work from home) खूपच आपत्कालीन परिस्थिती असल्यास किंवा आवश्यकता भासल्यास घराच्या बाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे.

त्याअनुषंगाने नाशिक महानगरपालिका हद्दितील सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी शैक्षणिक क्लासेस व खाजगी आस्थापना/कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळुन) बंद ठेवण्यात यावेत, शक्य असेल तेथे (work from home) व्दारे कामकाज करण्यात यावेत.तसेच ज्या ईमारतींना बेसमेंट आहेत तेथे पाणी साचण्याची शक्यता असुन त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन उपाययोजना करण्यात याव्यात.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मनपाच्या व जिल्हयाच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, तसेच मनपाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.धरण क्षेत्रातील व गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली असुन रामकुंड व आजुबाजुच्या परिसरात येणारे नागरिक/पर्यटक यांना नदिपात्रामध्ये जाणेस प्रतिबंध करणेत येत असुन नागरिकांनी त्या परिसरात जाऊ नये असे आवाहन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन महापालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाकडुन करण्यात येत आहे.

 

मनपा आपत्कालीन कक्ष : ०२५३- २५७१८७२

जिल्हा आपत्कालीन कक्ष : ०२५३-२३१७१५१ (१०७७)

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे