ब्रेकिंग

नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍याना. व दुधात शाम्पू टाकणाऱ्या , रॅकेटचा पर्दाफाश, १३ जणांना बेड्या.

दुधात शाम्पू मिसळले, रॅकेटचा पर्दाफाश, १३ जणांना बेड्या

 

प्रतिनिधी |

 

पुणे  तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविषयी अनेक महत्त्वाचे घटना समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून करणाऱ्या व

 

राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळमाफियांविरोधात पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत मोठी संयुक्त कारवाई केली आहे. एकाच वेळी पाच जिल्ह्यांमध्ये टाकलेल्या धाडीत दूध भेसळीचे मोठे आंतरजिल्हा रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून या प्रकरणी १३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या धडक मोहिमेत तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, दुधात शाम्पू-केमिकल मिसळण्यात येत असल्याचेही समोर आले.

 

(अशी व्हायची भेसळ

 

दूध उत्पादकांकडून डेअरीत येणाऱ्या १,००० लिटर शुद्ध दुधात तब्बल ५०० लिटर बनावट दूध मिसळले जात होते. हे बनावट दूध तयार करण्यासाठी उग्र वास न येणारा शाम्पू, घातक रासायनिक पदार्थ, पाणी आणि दूध पावडरचा वापर केला जात होता. हे विषारी दूध राज्यातील नामांकित ब्रँड्स आणि कंपन्यांना पुरवले जायचे.)

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे