ब्रेकिंग

शिक्षण, आरोग्य, उद्योग, आगामी मेट्रोमुळे प्लॉट गुंतवणूक फलदायी हिंमगोरी आडके नाशिक महापौर.

क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित प्लॉट एक्सपोच उद्घाटन.नाशिकच्या महापौर हिंमगोरी आडके यांच्या हस्ते

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिनिधी । नाशिक शहर हे थंड वातावरणामुळे व धार्मिक शहर म्हणून नाशिक शहराची ओळख देशविदेशात आहे. बारा वर्षातून भरणारा कुंभमेळा. शिक्षणाची पंढरी विमानसेवा रेल्वे सेवा शहराचा होत असलेला विकास . मंत्रभूमीचे तंत्रभूमीकडे चालू असलेला प्रवास. यामुळे नासिक मध्ये प्लॉट साठी गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे. असे नाशिकच्या महापौर हिंमगोरी आडके यांनी प्लॉट एक्स प्रो उद्घाटन प्रसंगी सांगितले. याविषयी अधिक माहिती अशी की

नाशिकमध्ये होत असलेले विकास कार्य, पायाभूत सुविधांची निर्मिती, रस्ते, विमान आणि रेल्वे सेवांचे वाढते जाळे येऊ घातलेली आगामी मेट्रो, शिक्षण, आरोग्य सेवा आणि उद्योग या मधील सकारात्मक वाढ या सर्वांमुळे नाशिकची प्रगती आता अनस्टॉपेबल आहे आणि या नाशिकमध्ये आज केलेली प्लॉटमधील गुंतवणूक भविष्यात निश्चितच फलदायी ठरणार असल्याचे मत महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी केले. १३ आणि १४ जून या दोन दिवस चालणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित प्लॉट एक्सपोच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे हा प्लॉट एक्स्पो होत आहे.

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ‘प्लॉट एक्स्पो’ च्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली असून या प्लॉट एक्स्पोला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. या एक्स्पोमध्ये अगदी १० लाखापासून पुढे प्लॉट्स उपलब्ध असून अशा प्रकारचा प्लॉट एक्स्पो म्हणजे पहिल्यांदाच

 

आयोजित करण्यात येत असल्याचेही क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नमूद केले. क्रेडाई एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा, माजी अध्यक्ष आणि नगरसेवक सुरेश पाटील, जितु ठक्कर, अनंत राजेगावकर, अविनाश शिरोडे आदी

(

संधींचा लाभ घेण्यासाठी प्लॉटमध्ये आज केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देईल असा आशावाद सहसमन्वयक श्याम साबळे यांनी व्यक्त केला. क्रेडाई नाशिक

मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेच म्हणाले, या एक्स्पोमुहे अर्थकारणास सकारात्मक चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पहिल्याच दिवशी नाशिककरांनी मोठी गर्दी प्लॉट एक्सपो बघण्यासाठी केली होती.

या प्रदर्शनामध्ये नाशिक शहर तसेच त्यांची त्र्यंबक घोटी इगतपुरी मतमालाबाद आडगाव पाथर्डी इंद्रा नगर मसरूळ वडनेर नांदूर नाका छत्रपती संभाजी नगर रोड नाशिक रोड ओझर या भागामध्ये प्लॉट खरेदी तसेच घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य मार्गदर्शन देखील या ठिकाणी करण्यात येत आहे.मुंबई पुणे जळगाव धुळे येथून देखील अनेक जण भेट देत असल्याचे एक्सपोर्चे समन्वयक भूषण कोठावदे सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे