सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रक येथे बिरोबाच्या मंदिरात चांदीचा मुखवटा चोरीला.

प्रतिनिधी |जनमत नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील मंदिरात दानपेटी चोऱ्या इत्यादी प्रकार घडत आहे. वाढती महागाई उशिरा पडणारा पाऊस बेरोजगारी यामुळे या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. काल सिन्नर तालुक्यातील
दोडी बुद्रुक येथे पाऊल टेकडीजवळ असलेल्या बिरोबा मंदिराचा चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा आणि ५३८ ग्रॅम वजनाचा हा मुखवटा एका भक्ताच्या घरातून चोरीला गेला असून, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
दोडी बुद्रुक येथील म्हाळोबा यात्रेनंतर मंदिरातील दागिने व देवस्थानचे अलंकार सुरक्षिततेसाठी भक्तांच्या घरी ठेवण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार हा मुखवटा भामबाई काशीनाथ शिंदे यांच्या घरी सुरक्षित ठेवण्यात आला
(गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी होण्याच्या एक दिवस आधी दोन अनोळखी व्यक्ती गावठी कोंबडीची अंडी घेण्याच्या बहाण्याने शिंदे यांच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे या व्यक्तींनीच रेकी करून चोरी केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.)
होता. मात्र, शुक्रवारी (दि. १२) हा मुखवटा घरातून चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे पंचक्रोशीतील भाविकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी महेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घबराड निर्माण झाले आहे. गावातील गावकऱ्यांनी प्रत्येक मंदिरात सीसीटीव्ही बसवण्याची गरज निर्माण झाली आहे सिन्नर पोलीस तपास करत आहे



