गोविंद नगर येथे क्रेडाई नाशिक मेट्रोच्या दोन दिवसीय ‘प्लॉट एक्स्पो’ आजपासून प्रारंभ – १० लाखांपासून प्लॉट प्रदर्शनात,
प्लॉट खरेदीसाठी छोटे व्यवसायिकांना मिळणार सुवर्णसंधी

–
प्रतिनिधी | नाशिक जनमत नाशिक शहरात लवकरच कुंभमेळा येत असून प्लॉट खरेदीची सुवर्णसंधी क्रीडई नाशिक मेट्रो तर्फे देण्यात आलेली आहे. नागरिकांनी दोन दिवसीय प्लॉट एक्सपोला भेट द्यावी असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. दहा लाखापासून या ठिकाणी प्लॉट मिळणार आहे. शनिवार व रविवार असल्याने सुट्टीचा फायदा घेऊन कुंभमेळ्याच्या अगोदर रो हाऊसेस रो बंगलो तसेच आपारमेंट इत्यादी बांधण्यासाठी आपले प्लॉट बुक करावे याविषयी सविस्तर माहिती अशी की
नाशिक शहर व परिसरातील प्लॉटची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रथमच ‘प्लॉट एक्स्पो’चे आयोजन केल आहे. गोविंदनगर येथील मनोहर गार्डन (ट्रीट हॉटेल) येथे हा दोन दिवसीय एक्स्पो आज शनिवार आणि उद्या रविवारी होणार असून यात १० लाखांपासून पुढे प्लॉट्स उपलब्ध आहेत.
एक्स्पोबद्दल माहिती देताना समन्वयक भूषण कोठावदे म्हणाले, या प्रदर्शनामध्ये नाशिक शहर तसेच
(एक्स्पोच्या माध्यमातून विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध
क्रेडाई एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा यांनी निवासी, औद्योगिक, व्यावसायिक, फार्म हाऊस व व्हिला प्लॉट्सच्या अनेक पर्यायांसाठी नागरिकांनी एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.
मखमलाबाद, आडगाव, पाथर्डी, इंदिरानगर, म्हसरूळ, वडनेर, नांदूर नाका, औरंगाबाद रोड, नाशिकरोड, ओझर या भागातील प्लॉट्स येथे उपलब्ध आहे. प्लॉट खरेदी तसेच घर बांधण्यासाठी अर्थसाहयाचे मार्गदर्शनही येथे करण्यात येईल.
एक्स्पोच्या माध्यमातून विश्विासार्ह, पारदर्शक आणि सुव्यवस्थित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे नमूद केले.
अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.
एक्स्पोचे सहसमन्वयक श्याम साबळे म्हणाले, प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८.३० अशी आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी गुंतवणुकीच्या सुवर्णसंधीचा नाशिककरांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. नाशिककरांना ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली असून नागरिकांनी भेट द्यावी.



