जातेगाव सोसायटी निवडणुकीमध्ये शिवनेरी पॅनल ला स्पष्ट बहुमत. 13 पैकी दहा जागांवर दणदणीत विजय.
जातेगाव सोसायटी निवडणूकी शिवनेरीला स्पष्ट बहुमत १३ पैकी १० जागांवर दणदणीत विजय
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक जनमत प्रतिनिधी अरुण हिंगमिरे यांच्याकडून नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बहूचर्चित सहा गावातील जवळपास ३००० सभासद असेलेल्या
विवीध कार्यकारी सेवा सोसायटीच्या तेरा संचालकांच्या निवडणूकीच्या मतदानासाठी १८८१ वैद मतदार पैकी
१४७७ मतदारांनी दि.४ एप्रिल रोजी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सकाळी ८ वाजेपासुन सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान केले.
वैद मतदारांच्या संखेनुसार ७८.५२ ℅ टक्के मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणीस सुरुवात झाली. मतदानाची टक्केवारी जास्त असल्याने मतमोजणीच्या १५० मतानुसार १० फेर्या घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये
अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत शिवनेरी शेतकरी विकास पॅनलचे नेते बंडू पाटील, सुभाष पवार, दत्तात्रय पाटील, भरत गायकवाड, पंढरिनाथ वर्पे,संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व साधारण गटासाठी नवणाथ पवार, बाबुभाई शेख, दिगंबर सुर्यवंशी, बाबु मानसिंग राठोड, रामदास चव्हाण, अंकुश पगारे, तर महिला राखीव गटामध्ये मंगलबाई निकम आणि जिजाबाई वर्पे, विमुक्त जाती भटक्या जमाती वर्गामध्ये पतींग चव्हाण, अनुसूचित जाती जमाती तील उमेदवार कैलास जोनवाल असे १० उमेदवार निवडून आणत पुन्हा एक हाती सत्ता राखण्यात यश मिळविले.
तर परिवर्तन पॅनलचे विजय चव्हाण आणि सर्वसाधारण गटातून धनंजय जानराव आणि नाना थोरात असे तीन उमेदवार निवडून आले आहे.
झालेल्या मतदानात सर्वसाधारण गटातील २२०, इतरमागास प्रवर्ग गटातील २०१, महिला राखीव १९७,
विमुक्त जाती/भटक्या जमाती २४८, अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांचे २३६ मतदान बाद झाले.
वरील निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चंद्रकांत विघ्ने हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होते त्यांना सहकार विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुरस्कृत पॅनल तयार झाले होते.
वरील दोन्ही पॅनल आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी वाडी-वस्ती तसेच इतर गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी मदत केल्याने पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याचे बोलले जात आहे.