आयकर पात्र शासकीय निवृत्ती वेतन धारकांनी माहिती सादर करावी. डॉक्टर राजेंद्र गाडेकर
दिनांक: 04 एप्रिल, 2022
*आयकर पात्र शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी*
*माहिती सादर करावी*
*:डॉ.राजेंद्र गाडेकर*
*नाशिक दि. 04 एप्रिल 2022 नाशिक जनमत
नाशिक जिल्हा कोषगार कार्यालय अंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे आणि आयकर कपातीस पात्र असणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी आयकर कपातीबाबत किती रक्कम कपात करावी याबाबतचे अर्ज एप्रिल 2022 अखेरपर्यंत कोषागार कार्यालयात सादर करावेत असे, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, ज्या निवृत्तीवेतनधारकांना आयकराची (टी डी एस) कपात समान हप्त्यात करावयाची आहे. त्यांनी याबाबतच्या कागदपत्रावर बँकेचे नाव, शाखेचे नाव नमुद करून पॅन कार्डची छायांकीत प्रत अर्जासोबत जोडावी. तसेच मार्च 2022 चे निवृत्तीवेतन नवीन आर्थिक वर्ष 2022-23 चे अनुदान प्राप्त झाल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च 2022 महिन्याचे निवृत्तीवेतन 5 एप्रिल 2022 पर्यंत संबधित बँकेमार्फत अदा होईल, असेही जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी कळविले आहे.