ब्रेकिंग

कांद्याचे भाव घसरले. नामपुर येथील शेतकऱ्यांने जीवन संपवले.

कर्ज फेडण्याच्या चिंतेने शेतकरी गुलाब निकम त्रस्त. शेतीमालाला भाव नसल्याने आत्महत्या.

 

 

 

 

प्रतिनिधी नाशिक जनमत 

अवकाळी पाऊस शेतीमालाला भाव नाही कांद्याचे कोसळलेले दर. युद्धामुळे झालेली महागाई इत्यादी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.

खर्च जास्त उत्पन्न कमी अशी अवस्था शेतकरी वर्गावर सध्या आलेली आहे मुलांचे लग्न खर्च याच्या  विचार करत नामपुर राहूड येथील  शेतकऱ्यांन आपले जीवन संपत्ती घटना घडली आहे.

अवकाळी पाऊस आणि कांद्याचे घसरते बाजारभाव, तिन्ही मुलांचे विवाह कसे होतील ही विवंचना आणि घेतलेले कर्ज फेडण्याचा ताण यामुळे बागलाण तालुक्यातील राहूड येथील शेतकरी गुलाब केशव निकम (वय ५९) यांनी गावाशेजारी

गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, ३ मुले आहेत. त्यांची ३ एकर शेती होती. शनिवारी जनावरांना चारा टाकण्यासाठी ते खळ्यात गेले रात्री शेतातच झोपले. सकाळी घरी न परतल्याने मुलगा चेतन खळ्याकडे गेला असता, ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे राहूड  गावामध्ये सुकाळा पसरली आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पीक चांगले आले तरी अचानक पाऊस येऊन कोसळतो. किंवा उत्पन्न केलेल्या मालाला भावच मिळत नाही.

बी बियाणे माघ झाले आहेत खताच्या किमती डबल टिबल झाले आहे. शेतात काम करण्यास मजूर मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीतून सध्या शेतकरी वर्ग जात असून सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका. यासाठी मार्ग काढणे महत्त्वाचे झाले आहे. शेतीप्रधान देशात वर्षांमध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे