न्यू समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी मध्ये दरोड्याचा प्रयत्न. एक जखमी

नाशिक जनमत नाशिक शहर धार्मिक शहर म्हणून देशात ओळख असली तरी सध्या गुन्हेगारी मुळे देशात गाजत आहे. खून मारामारी चोरी अपघात एक्सीडेंट सोनसाखळी चोरणे घरपोडी इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये वाढले आहे. गुन्हेगारी थांबवण्यात पोलिसां यांच्या प्रयत्नांना यश येत नाही कारण नाशिक मधील पंचवटी भागातील हिरावाडी येथे भरवस्तीत रात्री ९ वाजता सराफ दुकानात तोंडाला मास्क लावत ६ बंदुकधारी शिरले. त्यांनी बंदुका रोखत दुकानातील तिघांना मारहाण केली आणि गोळीबार करून दागिने लुटून पसार झाले. यात एक कर्मचारी जखमी झाला. रात्री उशिरा पंचवटी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले. अशी माहिती मिळत आहे या घटनेत दुकान मालक नयना पगारिया यांनी जोरदार प्रतिकार केला. त्यांच्या प्रयत्नामुळे व आरडा ओरड केल्याने दुकानाकडे नागरिकांचे लक्ष दिले व दरोडेखोर पळाले. दुकान मालक कर्मचारी यांच्या त मोठी झटापट झाली. घटनास्थळी ताबडतोब पोलीस हजर झाले यावेळी घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती

याबाबत सविस्तर माहिती अशी की नयना पगारिया यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानुसार . हिरावाडीत ‘न्यू समृद्धी ज्वेलर्स’ नावाचे सराफ दुकान आहे. रात्री ९ वाजता दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना, दुकानात एक महिला कर्मचारी आणि श्श्रीमान उपस्थित होते. त्याचवेळी ६ दरोडेखोर दुकानत घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखत जागेवर गोळ्या घालण्याची धमकी दिली.

मात्र, मालक नयना यांनी बंदुकीला न घाबरता जोरदार प्रतिकार केला. श्री श्रीमाळ यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डोक्यावर बंदुकीने बार करून जखमी केले. नयना यांनी काउंटरवरून उडी मारत दरोडेखोरांना प कडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोर न दुचाकींवरून फरार झाले. या घटनेमुळे हिरावाडी परिसरात दहशत निर्माण झाली. यातील एका दरडेकरांनी गोळीबार केल्याचे घटनास्थळावर सांगत होते. जखमी श्री अमित श्रीमाळ यांना एका रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे. तुमच्या डोक्यात मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पंचवटी पोलिसातर्फे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ताबडतोब परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात दोन आरोपी संभाजीनगर रोड वरून ताब्यात घेतल्याचे माहिती मिळत आहे

