सातपूर मधील महिण्यात सहावी घटना. युवकाचा मृत्यू अवजड वाहने कडे पोलिसांचे दुर्लक्ष.

सातपूर मधील महिण्यात सहावी घटना. युवकाचा मृत्यू अवजड वाहने कडे पोलिसांचे दुर्लक्ष.
सातपूर परिसरातील अपघातात दुचाकीस्वार जखमी
नाशिक जनमत गेल्या एक महिन्यात सहा जणांना अवघड वाहनांच्या धडकेमुळे 6जणाचा चा प्राण गेला आहे. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवजडवाहने नाशिक शहरात प्रवेश करून नागरिकांचे जीव घेत असल्याचे मागील काही घटना वरून दिसत आहे. काल साtपूर श्रमिकनगर येथे बुधवारी (दि. १३) सकाळी सव्वाआठच्या सुमारास आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. चेतन ईश्वर पाटील (वय १८) असे मृताचे नाव असून, या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या तरुणाच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होत
कुटुंबातील एकुलत्या चेतनने नुकतेच बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळविले होते. तो शहरातील के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचा विद्यार्थी होता. त्यामुळे पाटील कुटुंबातील सर्वच आनंदात असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. हा मोठा आघात झालेला असतानाही चेतनच्या कुटुंबीयांनी त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते.
चेतनसोबतचा दुचाकीचालक विवेक शर्मा याचा हात फॅक्चर झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन दुचाकीवरून मित्र विकास शर्मा याच्यासोबत जात असताना कडेपठार श्रमिकनगर येथे आयशर ट्रकने (एमएच १९, झेड ४२३६) सकाळी सव्वाआठ वाजेच्या
सुमारास त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या चेतनचे डोके व छातीला मार लागला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. चेतनचे वडील घंटागाडी कर्मचारी असून, त्याच्या पश्चात आई व लहान बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी कंटेनर तसेच डंपर टिप्पर इत्यादी वाहनांच्या प्रवेशावर नजर ठेवावी. बे जोरदारपणे वाहने चालवल्याने अनेकांची बळी जात आहे. त्यात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्तेखोदल्याने ठेवल्याने ट्राफिक जाम होत आहे. शहरातील ट्राफिक समस्या नागरिकांना संताप देणारे ठरत आहे.


