मखमलाबाद रस्त्याकडे जाणाऱ्या पाटा जवळ गॅसच्या टाक्याने भरलेला ट्रक पलटी

नाशिक जनमत रात्री बारा वाजेच्या दरम्यान गॅसच्या टाक्यांनी भरलेला एक ट्रक मखमलाबाद रोडवर जात असताना महादेव बागच्या पुढे असलेल्या पाटाजवळ ट्रक पलटी झाला यावेळी मोठ्या प्रमाणात गॅसच्या टाक्या गाडीतून खाली पडल्या होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
याबाबत सविस्तर वृत्त असे की मखमला बाद गावाकडे जाणाऱ्या गॅसने भरलेल्या टाकीचे नियंत्रण सुटले. व ट्रक पलटी झाला. रात्रीचा टाईम असल्याने मोठा आवाज आला जवळच असलेले नागरिक तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळावर थांबून ट्रकमध्ये असलेल्या ड्रायव्हरला अगोदर बाहेर काढले. वयस्कर असलेला ड्रायव्हर मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता त्याला दवाखान्यात नेण्यात आले.

जखमी असताना देखील ड्रायव्हर बोलत होता की मला ट्रक बाजूला लावू द्या नंतर मला दवाखान्यात घेऊन जा. परंतु ट्रक तर रस्त्यावर पडलेला होता. नागरिकांनी त्यास उपचारार्थ दवाखान्यात नेले. नंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. सध्या गॅस टंचाई असल्याने गॅसच्या टाक्यांची चोरी होऊ नये यासाठी घटनास्थळावर पंचवटी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. घटनास्थळावर सकाळी दिवस उगल्यावर मोठी गर्दी झाली आहे 



