ब्रेकिंग

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास मालेगाव येथे अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

 

 

 

 

जिल्हा अभिलेखावरील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला मालेगावातील सराईत गुन्हेगार अकबर चौथा अटक – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

नासिक जनमत   नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्धचे गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी, फरार आरोपी, हिस्ट्रीशीटर, टोळी हिस्ट्रीशीट, तडीपार गुन्हेगार यांचे सतत नवविकसिताबाबत गोपनीय माहिती घेऊन त्यांच्यावर सतत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिलेले होते त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाणेतील अभिलेखावरील आरोपींवर विधी कलमांन्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

 

त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार मालेगाव शहरात गुन्हेगार चेकिंग करीत असताना, मिळालेल्या गुप्त माहितीदार जिल्हा अभिलेखावरील विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अकबर चौथा हा नवीन बसस्थानक परिसरात आल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने नवीन बसस्थानक परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे अकबर खान हबीब खान उर्फ अकबर चौथा, वय ४०, रा. सबंध नं. १११, प्लॉट नं. २२२, किस्मत कॉलनीजवळ, मालेगाव यास ताब्यात घेतले आहे. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याबाबत कबुली दिली आहे.

 

१) पवारवाडी पो.स्टे. गु.रं २०४/२०२४ भा.दं.सं. कलम ११८(२), ११८(१), १११(२), १९२(२), १९०.

२) मालेगाव शहर पो.स्टे. गुं.रं ८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३७(४), ३०५(अ).

३) येवला शहर पो.स्टे. गुंरं ८८८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५, ३३७(४), ३२४(४), ३(५).

४) जिल्हा पेठ पो.स्टे., जि. जळगाव गुंरं १०४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५

यातील आरोपी अकबर चौथा हा मालेगाव शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी चोरी, घरफोडी, दरोडा यासारखे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस पवारवाडी पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याचेकडून मालमत्तेविरुद्धचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. निखिल गुप्ता यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. लक्ष्मण सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश तांबे, पोलीस अंमलदार शुभम चौधरी, दत्ता माळी, आबा पिसाळ, कैलास मानकर, बाळाजी कुंडलकर, तांत्रिक विभागाचे पोहवा हेमंत गिलबिले, प्रदीप वाघमारे, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे