बँक ऑफ महाराष्ट्रवर भर दुपारी दरोडा; ३५ लाख लुटले
नाशिक जनमत मध्यप्रदेश – मध्यप्रदेश मध्ये दहा मिनिटांमध्ये एका बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून 35 लाख रुपये लुटून नेण्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील बैढण परिसरात आज शुक्रवारी दुपारी थरारक प्रकार घडला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ५ सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून केवळ १० ते १५ मिनीटात ३५ लाख रूपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीचे दागिणे लुटले. दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी बँकेत फायरिंग केली आणि विरोध करणाऱ्या बँक मॅनेजरवर जिवघेणा हल्ला केला.
दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास जेव्हा बँकेत ग्राहकांची वर्दळ असते तेव्हा चेहरा लपवलेले दोन तरूण आत शिरले. त्यांच्या मागोमाग इतर तीन साथीदार हातात पिस्तूल आणि शस्त्रे घेऊन आले. बँकेत शिरताच दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरूवात केली. जेव्हा शाखा व्यवस्थापकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न
केला तेव्हा त्यांना शस्त्राच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. अवघ्या २० मिनीटात दरोडेखोरांनी कॅश काऊंटर आणि तिजोरीतील ३५लाख रूपये बॅगेत भरले. जातांना त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्रणालीचे नुकसान करण्याचा प्रयत्नही केला. दरोडा टाकल्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून जंगलाच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण जिल्ह्याची नाकेबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दरोडेखोर हेल्मेटमध्ये तर इतर चार उघड्या तोंडाने दिसत आहेत. पोलीसांनी चारही बाजुंनी सीमा सिल केल्या आहेत. या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेश मध्ये खळबळ उडाली आहे. बँकेची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. पोलिसांतर्फे वेगवान तपास चालू आहे.

