मनपाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन*


*मनपाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन*
नासिक जनमत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई नाका , सावित्रीबाई फुले चौक , फुले स्मारक येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
*मुंबई नाका*
मुंबई नाका , सावित्रीबाई फुले चौक , फुले स्मारक येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास कुंभमेळा मंत्री ना.गिरीश महाजन,महापौर हिमगौरी आहेर आडके, खासदार राजाभाऊ वाजे, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते अजय बोरस्ते,गटनेते केशव पोरजे यांनी पुष्पहार अर्पण केले.यावेळी मनपा नगरसेवक,नगरसेविका व पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.
*मनपा मुख्यालय*
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके ,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुरेश पाटील,नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे , साहेबराव भोसले, लेखापरीक्षण विभागाचे महेंद्र केंदळे,सुरक्षा विभागाचे शैलेश गायकवाड, किरण मरवट,मयूर चराटे,महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी अरुण सानप, गणेश पाटील,राहुल लांडगे आदींसह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

