पोलिसांनी ट्रक पेटवल्याचा चालकाचा आरोप येवला येथील घटना.

नाशिक जनमत पिंपळगाव जलाल शिवारामध्ये पोलिसांनी अडवलेला ट्रक. ड्रायव्हर व पोलिसांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेला वाद व त्यातून ट्रक पेटवल्याचा आरोप ड्रायव्हर ने केला आहे. पाच हजाराची लाच मागत असल्याचे ट्रक ड्रायव्हर सांगत आहे. लाच न दिल्याने पेटते सिगरेट ट्रकवर टाकल्याने ट्रक ने घेतल्याचे ट्रक ड्रायव्हर सांगत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खरवड आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात पुणे-इंदूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ आर्मीचे साहित्य घेऊन जाणारा आयशर ट्रक जंळून खाक झाला. ट्रकला आग लागल्याने स्फोटांचे आवाज, आगीचे लोळ आणि उडणारे गॅस सिलिंडर यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली, तर ट्रकचालक जगतार सिंग यांनी, पोलिसांमुळेच ट्रकला आग लागली आणि आपले मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला.
पुणे येथून आर्मी सीओडीचे साहित्य घेऊन भटिंडा (पंजाब) कडे जात असताना पिंपळगाव जलाल टोलनाक्या जवळ महामार्ग (हायवे ट्रॅप) पोलिसांनी ‘नो एंट्री’ चे कारण देत आपली आयशर ट्रक अडववून ‘३० हजाराचा दंड भर किंवा पाच हजाराची लाच दे’, अशी मागणी केली. मी, लाच देण्यास नकार दिल्यानंतर वाद वाढला आणि एका पोलिसाने फेकलेल्या सिगारेटमुळे ट्रकमधील एसी गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचा आरोप ट्रकचालक जगतार सिंग यांनी केला. दरम्यान, येवला नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव
घेत आग आटोक्यात आणली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे.

येवला दौऱ्यावर आलेले मंत्री छगन भुजबळ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोटारीने मुंबईकडे परतत असताना पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर वाहनचालकांनी त्यांचा ताफा अडवून घडलेली घटना सांगितली. मंत्री भुजबळ यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात दोषींवर कारवाईचे आदेश दिले. पोलिसांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची फास्ट मध्ये तपास करून ड्रायव्हरला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ट्रक व्यवसाय करणाऱ्यांनी केली आहे.

