ब्रेकिंग

यात्रेत भरणारी टांगा शर्यत नडली. वय वृद्ध रघुनाथ शिंदे यांचे घोड्याचा धक्का लागून निधन.

 

नासिक जनमत   निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे कोणतीही परवानगी न घेता भरवलेल्या टांगा शर्यतीमध्ये एका घोड्याचा धक्का लागून वयस्कर रघुनाथ शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे टागा शर्यत आयोजक यांच्या विरोधात निफाड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तालुक्यातील नांदुर्डी येथे हरिभूषाबाबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बेकायदेशीर टांगा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात एका ८८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सात टांगा शौकिनांविरोधात निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निफाड पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी धनंजय प्रल्हाद

जाधव यांनी फिर्याद दिली आहे. या शर्यतीसंदर्भात पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती, तसेच यापूर्वी प्रशासनाने शर्यत न भरविण्याबाबत नोटीसही दिली होती. तरीदेखील कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता निष्काळजीपणे घोडा व बैलांच्या टांग्यांची शर्यत आयोजित केली गेली.

आल्याने त्यांचा मृत्यू झाला. संबंधित प्रकाराची पोलिसांना माहिती न देता शर्यतीदरम्यान नांदुर्डी येथील रघुनाथ विठ्ठल शिंदे (वय ८८) हे टांग्याखाली प्राण्यांना निर्दयतेने वागणूक दिल्याच्या आरोपाखाली सुभाष बबन खापरे, राहुल भगवान खापरे, संजय कारभारी आहेर, मधुकर त्र्यंबक कुभार्डे, तानाजी मुरलीधर खापरे, किशोर कैलास निकम व सोपान निवृत्ती देवकर (सर्व रा. नांदुर्डी, ता. निफाड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या घटनेवरून इतर गावातील नागरिकांनी देखील प्रशासनाची परवानगीशिवाय टांगा शर्यत घेऊ नये. मुक्या जनावरांना त्रास देऊ नये. परवानगी न घेता शर्यत घेतली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे