ब्रेकिंग

इंदिरानगर प्रभाग दौऱ्याने घेतली गती; पाणी व रस्ते प्रश्नांवर तात्काळ निर्णय

इंदिरानगर प्रभाग दौऱ्याने घेतली गती; पाणी व रस्ते प्रश्नांवर तात्काळ निर्णय

इंदिरानगर (प्रभाग क्र. ३१) येथे महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या दौऱ्यामुळे नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी व रस्त्यांच्या प्रश्नांना आता गती मिळताना दिसत आहे. नागरिकांनी मांडलेल्या समस्या प्रत्यक्ष ऐकून महापौरांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

महापौर आणि उपमहापौरांनी नगरसेवक भगवान दोंदे, बाळकृष्ण शिरसाठ आणि माधुरी डेमसे यांच्यासह ज्ञानेश्वर नगर, म्हाडा वसाहत, स्वराज्य नगर, पोद्दार शाळा परिसर, खत प्रकल्प, गौळाने रस्ता, पाथर्डी, दाढेगाव आणि पिंपळगाव या भागांचा सखोल दौरा करत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई आणि नववसाहतींमधील मूलभूत सुविधांचा अभाव यावर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.

पोद्दार शाळा परिसरासह विविध भागांतील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आदेश देत महापौरांनी नागरिकांना दिलासा दिला. तसेच ज्ञानेश्वर नगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि पाथर्डी-गौळाने परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले.

खत प्रकल्पातून निघणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येवरही ठोस भूमिका घेत हे पाणी पिंपळगाव खांब येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वळविण्याच्या कामाला गती देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

महत्त्वाच्या निर्णयांना मिळाली दिशा :

दाढेगाव-पाथर्डी दरम्यान वालदेवी नदीवरील धोकादायक पुलाऐवजी नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाला गती

पिंपळगाव खांब, चिंचवाडी व जाधववाडी भागासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा विचार

गामने मैदानातील ट्रॅकसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका

 

 

 

 

या दौऱ्यामुळे अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महापौरांचा प्रभाग दौरा केवळ समस्या ऐकण्यापुरता मर्यादित न राहता त्यावर कृती होत असल्याने प्रभाग क्रमांक ३१ मधील हा दौरा प्रभावी व यशस्वी ठरत आहे.या दौऱ्यात शहर अभियंता संजय अग्रवाल श्री धारणकर अधीक्षक अभियंता ,श्री आवेश पलोड संचालक घनकचरा, श्री विशाल गरुड कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा ,श्री रविंद्र पाटील कार्यकारी अभियंता बांधकाम विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे हेमंत पठ्ठे उपअभियंता बांधकाम ,संजय गांगुर्डे विभागीय स्वच्छता निरीक्षक ,गीते उपभियंता आदी अधिकारी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे