ब्रेकिंग

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये गवताला आग नागरिकांमध्ये घबराट

 

 

सातपूर मार्च महिना उष्णतेचा  कडाका : वाढते तापमान यामुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रात घडू लागले आहेत. नाशिक मधील औद्योगिक वसाहतीतील

 

सातपूर पोलिस ठाण्यामागील महावितरण कंपनीच्या परिसरात वाळलेल्या गवताला मंगळवारी आग  दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या ठिकाणी विद्युत विभागाचे कार्यालय आजूबाजूला दाट वस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गवत पूर्णपणे वाळलेले असल्यामुळे आग वेगाने पसरत होती. मात्र, पालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन बंबांद्वारे जवानांनी आग वेळीच आटोक्यात आणली. खबरदारी म्हणून ३३ केव्हीचे फीडर बंद करण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाढणारी तापमान नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान मार्च महिना लागला की कंपन्यांना आग लागणे तसेच विविध ठिकाणी आगीच्या घटना घडणे नेहमीचे झालेले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे