महागाईच्या वणव्यात सर्वसाधारण होरपला. सरकारला गरिबांची चिंता नाही.
नाशिक जनमत. गेल्या दोन वर्षापासून कोरोणाचे संकटापासून आता कुठे सर्वसाधारण नागरिक आर्थिक स्थितीतून बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. गेल्या दोन वर्षात लोक डाऊन शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही . आजार बेरोजगारी यामध्ये मनुष्य पूर्णपणे हैराण झालेला आहे नैसर्गिक संकटे अति पाऊस वाढती महागाई यामुळे नागरिकांना जीवन नकोनकोशी झाले आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत एकीकडे चार महिन्यापासून एसटीचा संप चालू आहे त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत अजूनही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे त्याच प्रकारे सर्वसामान्य देखील हाता गाईस झालेला आहे.कोरोणा च्या अगोदर 75 रुपये किलोने घेणारे गोड तेल आज 160 ते 170 रुपये किलो मिळत आहे डाळिंब चे भाव वाढलेले आहे 80 रुपये लिटर मिळणारे पेट्रोल 115 रुपये लिटर प्रमाणे आज द्यावा लागत आहे रेल्वे भाडेवाढ झालेली आहे एसटीची भाडेवाढ झालेली आहे खाजगी गाड्या वाल्यांची भाडेवाढ झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात भाडेवाढ महागाई वाढली असताना या मागायचं कुठलेच गांभीर्य सरकारला नसल्याचे दिसत आहे सरकार आपल्या तिजोरी भरण्यात मग्न आहे विविध कर नागरिकांवर लादले जात आहे शेतकरी वर्गाकडे लाईट बिल भरण्याची पैसा नाही कारण की दोन वर्षापासून शेतीमालाला भाव नाही त्याचप्रकारे घरातील नागरिकांच्या आजारपणामुळे तसेच नैसर्गिक संकटामुळे कर्ज कसे फेडायचे या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे दरवर्षी संकट हे शेतकऱ्याला नेहमीचे झाले आहे सर्वसामान्य जनतेला जगावं कसं असा प्रश्न आता पडलेला आहे कपड्या पासून तर घरापर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामानाने माणसाच्या रोजगारामध्ये व आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली नाही महागाईने कंबरडे मोडले आहे असे असताना सरकारे मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना दिसत आहे सर्वसामान्य कसा जगतोय त्याचे काय हाल होत आहे चारशे रुपयांच्या गॅस आज एक हजार रुपये किमतीने केव्हा लागत आहे दोनशे रुपये येणारे लाईट बिल हजारावर येऊ लागला आहे रशिया युक्रेन युधाने त्यात अजूनही भर पडली आहे. सरकारने दिल्ली सरकार सारखे लाईट बिल माफ करावे शिक्षण आरोग्य यासाठी दवाखाने फ्री करावेत मनुष्याला लागणाऱ्या मूलभूत गरजा यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलत द्यावी जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे झाले आहे करुणा सारखे संकट आता सर्वसामान्यांना नको आहे आर्थिक निर्बंध देखील नको आहेत. नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जनतेला मोठी आशा होती महागाई कमी होईल डिजिटल झाला परंतु सर्वसामान्य जनता व ग्रामीण भागामध्ये विकास आजही झालेला नाही शहरी भागाप्रमाणे सरकारने ग्रामीण भागातही लक्ष दिले पाहिजे अनेक सुविधा दिल्या पाहिजे ग्रामीण भागातील मूलभूत गरजा पाणी आरोग्य गोरगरिबांसाठी घरे रेशन वेळेवर मिळाले पाहिजे . वाढत्या महागाईला लगाम घालने महत्त्वाचे झाले आहे. देशातील जनतेला आता सरकारने वार्यावर सोडले यासारखे वाटत आहे ग्रामीण भागात रोजगार मिळाला पाहिजे शेतकरी वर्गाची मुले यांना चांगलं ग्रामीण भागात शिक्षण मिळायला हवे दरम्यान वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जीवन नकोनकोसे केलेले आहे लग्नकार्य आजार घरात लागणाऱ्याना किराणा. इत्यादी वस्तू साठी पैसा आणायचा कुठून भर उन्हामध्ये पावसा मध्ये चित्रांमध्ये रात्री-अपरात्री पाणी भरून काढलेल्या पिकाला भाव नाही यातच रात्रीतून तोंडात आलेला घास नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याचा हिरावला गेलेला आहे पिकावर पडणारी विविध रोग बदलता हवामान यामुळे शेतीतून उत्पन्न कमी झालेला आहे करुणा मुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत अनेक जण कोरोणाच्या या आजारामुळे शरीर शरीर अशक्त झालेले आहे त्यातच वाढती महागाई जीवनातील अत्यावश्यक अनेक समस्या यामुळे मनुष्य हजर होऊन गेलेला आहे श्रीमंत श्रीमंत होतोय गरीब तो गरीब होत आहे अनेक जण त्यामुळे आत्महत्या व व्यसनाधिन होत असल्याचे चित्र देशांमध्ये होत आहे राजकारणी पुढारी मंडळी नागरिकांचे कल्याण करता-करता स्वतःचे कल्याण करत आहे व जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मनुष्याच्या या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत अण्णा मध्ये गोड तेल कडधान्य गॅस यांची भरमसाठ झालेली वाढ. तर कपडे किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचप्रमाणे निवारा मध्ये घराच्या किमती स्टील सिमेंट सर्वच वाढल्याने वीस लाख मिळणार घर 27 28 ला लाखाला मिळत आहे. एकीकडे गॅस पेट्रोल डिझेल सर्वांच्या किमती वाढत असताना जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या कांदा द्राक्ष भाजीपाला याचा भाव कोसळत आहे शेतकरी वर्गावर लाईट बिल भरण्यासाठी वीज मंडळाकडून मनमानी होत आहे शेतकरी वर्गाला उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी वीज बिले कर्ज कुठून भरणार असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना जीवन जगताना पडू लागला आहे घर पट्ट्या वाढलेले आहेत पान पट्ट्या वाढलेले आहे त्यातच विविध कर वाढलेले आहे शासनाचे निर्बंध हे देखील आता जनतेची डोकेदुखी ठरत आहे सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याचे चित्र आज जनतेसमोर दिसत आहे महागाईचा भस्मासुर राक्षस याला आवर घालण्याची गरज आता देशातील जनतेसाठी देशाच्या राजाला काहीतरी उपाय योजना करावी लगण्याची वेळ आली आहे.